शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी ओळखीचा पुरावा आवश्यक

By admin | Updated: February 11, 2017 00:01 IST

पर्याय : खात्री केल्यानंतरच मतदानाची मुभा

 नाशिक : २१ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार यादीत नाव असलेल्या सर्वच मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा. परंतु, बोगस वा तोतया मतदारांकडून मतदान होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना ओळखपत्र सक्तीचे केले असून, ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही, त्यांना अन्य पर्याय सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत प्रत्येक मतदाराचे छायाचित्र आहे. त्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या मतदाराची ओळख पटविण्याचे काम मतदान केंद्राध्यक्षाचे असून, त्यासाठी त्यांनी अगोदर मतदारांना निवडणूक आयोगाने वितरीत केलेल्या मतदार कार्डाची मागणी करून त्याआधारे ओळख पटविण्याचा प्रयत्न करावेत, असे आयोगाने म्हटले आहे, परंतु मतदाराकडे मतदारकार्ड नसेल तर तो मतदानापासून वंचित राहू नये म्हणून अन्य १७ पुरावे पर्याय म्हणून आयोगाने निश्चित केले आहेत. त्यात प्रामुख्याने पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटो सहीत दिलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयीकृत बॅँका अथवा पोस्ट आॅफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकराने अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादींना फोटो सहीत दिलेले प्रमाणपत्र, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहीत अपंगत्वाचा दाखला, मालमत्तेबाबतची कागदपत्रे तसेच नोंदणी खत (फोटोसहीत), राजय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत फोटोसहीत देण्यात आलेला शस्त्र परवाना तसेच रोजगार हमी योजनेखालील देण्यात आलेले फोटोसहीत ओळखपत्र, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पासबुक, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेले निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्तींचे फोटो असलेले ओळखपत्र, वयस्कर निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या विधवांचे फोटो असलेले प्रमाणपत्र, केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटासहीत कार्ड, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी दिलेली शिधापत्रिका कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल, तसेच जर शिधापत्रिकेवर एकाच व्यक्तीचे नाव असल्यास त्याने स्वत:च्या वास्तवाचा अन्य पुरावा जसे वीज वापराचे देयक, दूरध्वनी वापराचे देयक, प्रॉपर्टी कार्ड किंवा घरपट्टी भरल्याची पावती सोबत असणे बंधनकारक राहणार आहे. या शिवाय आधारकार्डदेखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. उपरोक्त पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा मतदाराने दाखविणे व त्याच्या आधारे मतदान केंद्राध्यक्षाने खात्री करूनच मतदाराला मतदानाची अनुमती द्यावी, असेही आयोगाने सूचना दिल्या आहेत.