शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना केलेल्या लाठीमाराचा निषेध

By admin | Updated: October 8, 2016 00:03 IST

कळवण : आर. के. एम.मधील शिक्षक संघटनेतर्फे निवेदन

कळवण : गेल्या अनेक वर्षांपासून योग्य व प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे याविषयी लेखी निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना औरंगाबाद येथे पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेचा व शासनाचा कळवण येथील आर.के.एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक संघटनेने व विनाअनुदानित विभागाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.याविषयी लेखी निवेदन कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना येत्या एक महिन्यात अनुदान दिले नाही तर या शिक्षकांतर्फे बारावीच्या परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.औरंगाबाद येथे मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याला उत्तर म्हणून संतप्त शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलीस आणि शिक्षकही जखमी झाले आहेत. शिक्षकांनी आंदोलनावेळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि घोषणाबाजी केल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला याचा किशोर पगार यांनी निषेध नोंदवला असून, शासनाने याप्रश्नी दखल घ्यावी नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक नेते किशोर पगार यांनी यावेळी दिला.यावेळी आर. बी. बोडके, एच. आर. गवळी, बी. एच. भारती, बा. सी. आहिरे, बी. एस. दिवटे, पी. एस. बिरारी, साखरे, एस. पी. बागुल, ए. एस. बच्छाव, यू. बी. कायस्थ, के. एस. पगार, उमेश कापडणीस, एस. पी. सोनवणे, पी. बी. नेरकर, नीता निकम, जी. डी. निरगुडे आदिंसह शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)