शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पवनपुत्र हनुमानच्या जयघोषात मिरवणूक

By admin | Updated: April 24, 2016 10:39 IST

पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी श्रीराम शक्तिपीठ ब्रह्मचारी आश्रम तर्फे हनुमान जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी श्रीराम शक्तिपीठ ब्रह्मचारी आश्रम यांच्यातर्फे हनुमान जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भगवे ध्वज, सजविलेल्या वाहनावर हनुमानाची गदाधारी मूर्ती, ताल वाद्ये, वाजंत्री, ढोल-ताशे आणि डीजेवर सुरू असलेली भक्तिगीतांनी मंगलमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली. त्र्यंबकेश्वरच्या श्रीराम शक्तिपीठ ब्रह्मचारी आश्रमातर्फे काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे यंदाचे दुसरे वर्ष होते.वाकडी बारव येथून प्रारंभ झालेल्या या मिरवणुकीचे श्रीराम शक्तिपीठाचे पीठाधिश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, आनंद आखाड्याचे प्रमुख सागरानंद सरस्वती महाराज पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कलाकारांनी सादर केलेल्या लोकनृत्यांनीही विशेष दाद मिळवली. ही शोभायात्रा पुढे दूध बाजार, गाडगे महाराज पुतळा, महात्मा गांधी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डमार्गे या शोभायात्रेची रामकुंडावर सांगता करण्यात आली. शोभायात्रेच्या मार्गात अनेक सुवासिनींकडून मारुतीच्या मूर्तीची भक्तिभावाने पूजा करण्यात आली. या शोभेयात्रेत १२५ किलोग्रॅम वजनाचा मोदक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता तसेच शोभायात्रे दरम्यान साहसी खेळांचेही प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आली. या शोभायात्रेत आमदार देवयानी फरांदे, सुनील बागूल, जगन पाटील, लक्ष्मण सावजी यांनी सहभागी होत उपस्थितांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)