शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

खासगीकरणाचा घाट, रसिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:21 IST

महाकवी कालिदास कलामंदिर हे नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले एकमेव अद्ययावत आणि सोयीचे नाट्यगृह असून याठिकाणी नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा, छोटी साहित्य संमेलनेदेखील होतात; परंतु आता खासगीकरणानंतर असे कार्यक्रम होणे अत्यंत खर्चिक ठरणारे आहे.

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर हे नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले एकमेव अद्ययावत आणि सोयीचे नाट्यगृह असून याठिकाणी नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा, छोटी साहित्य संमेलनेदेखील होतात; परंतु आता खासगीकरणानंतर असे कार्यक्रम होणे अत्यंत खर्चिक ठरणारे आहे. किंबहुना यापुढे कलावंत, साहित्यिक व रसिकांना अत्यंत त्रासाचे ठरणार आहे, असे मत साहित्यिक, कलावंत व सर्वसामान्यांनी व्यक्त केले.कालिदास नाट्यगृहाच्या खासगीकरण करण्यालामाझा विरोध आहे. त्याऐवजी एखाद्या चांगल्या संस्थेकडे नाट्यगृह चालविण्यासाठी द्यावे. सर्वसामान्य जनतेला हा आर्थिक भुर्दंड होईल, खासगीकरणामुळे तिकिटाचे दर वाढतील असे होऊ नये. यासाठी सर्वांनी आवाज उठवायला पाहिजे. कला रसिकांना कोणत्याही कलेचा निखळ आनंद घेता यायला हवा असे वाटते. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी नाशिक शहरातील सर्व नागरिकांनी तसेच कलारसिकांनी एकत्र येऊन याबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.  - सविता चतुर ,  सामाजिक कार्यकर्त्या, द्वारकामहाकवी कालिदास कलामंदिराचे खासगीकरण झाले तर सर्वसामान्य कलारसिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अनेक सांस्कृतिक नाटके येथे होतात; परंतु आता नाटकांचे तिकीट दरदेखील वाढतील, कारण नाट्यगृहाच्या खासगीकरणामुळे देखभालीचा खर्च वाढेल. शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेले नाट्यगृह सर्वांच्या सोयीचे ठरणारे असून, शहराच्या सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीसाठी उपयुक्त ठरणारे आहे. त्यामुळे त्याचे खासगीकरण करू नये.  - सुभाष सबनीस (कवी) ,  सचिव, नाशिक कवी संस्था

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका