शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

खतप्रकल्पाचे खासगीकरणस्थायीवर

By admin | Updated: December 19, 2015 23:50 IST

लवकरच प्रस्ताव : हरित लवादाच्या आदेशानंतर कार्यवाहीस वेग

नाशिक : शहरातील वाढत्या प्रदूषणाला महापालिकेचेच दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे सांगत पाथर्डी शिवारातील खतप्रकल्पातील कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नाही तोपर्यंत कोणत्याही बांधकामांना परवानग्या देऊ नका, असा आदेश पुण्याच्या हरित लवादाने दिल्यानंतर पालिका प्रशासनाने खतप्रकल्पाच्या खासगीकरणाच्या कार्यवाहीला गती देण्यास प्रारंभ केला आहे. लवकरच निविदा प्रक्रियेसंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीवर मंजुरीसाठी पाठविला जाणार असून, नववर्षाच्या प्रारंभी खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. महापालिकेच्या खतप्रकल्पाला घरघर लागली असून, तो पूर्ण क्षमतेने चालविला जात नाही. अपुरे मनुष्यबळ आणि जुनी झालेली यंत्रसामग्री यामुळे खतप्रकल्प चालविणे महापालिकेपुढे आव्हानात्मक बनले आहे. एकीकडे कचऱ्याचे ढीग साचत असल्याने आणि दैनंदिन त्याची विल्हेवाट लावणे अवघड होऊन बसल्याने परिसरातील प्रदूषणातही भर पडत आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी खतप्रकल्पाचे खासगीकरण हाच एकमेव त्यावर उपाय शोधत कार्यवाही सुरू केली होती. महासभेनेही त्यास मंजुरी दिलेली असून, गेल्या काही महिन्यांपासून निविदा प्रक्रियेबाबत घोळ सुरू होता. आयकॉस या फ्रेंच कंपनीच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील मेलहॅम यांनी खतप्रकल्प चालविण्याची तयारी दर्शविली असून, त्यांची ७०० रुपये प्रतिटन याप्रमाणे न्यूनतम दराची निविदा प्राप्त झालेली आहे. सदर खतप्रकल्प ३० वर्षे कालावधीसाठी चालविण्यास दिला जाणार आहे. महापालिका घंटागाडीमार्फत कचरा संकलन करून तो खतप्रकल्पावर नेऊन पोहोचविणार असून, त्यानंतर कचऱ्यावरची प्रक्रिया करण्यापासून खतनिर्मितीपर्यंतचे सारे व्यवस्थापन सदर कंपनीच्या हाती सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे खतप्रकल्प सुरळीत चालविण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. सदर निविदा प्रक्रियेवर काही आक्षेप आल्याने प्रस्ताव रखडला होता. सदर आक्षेपांचे निराकरण करण्याचे काम सुरू असतानाच हरित लवादाचाही आदेश आल्याने प्रशासनाने आता खतप्रकल्पाच्या खासगीकरणाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली असून, पुढील आठवड्यात स्थायीवर परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर नव्या वर्षाच्या प्रारंभीच खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा होण्याचीही शक्यता आहे. (प्रतिनिधी)