शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

खासगी बस-ट्रॅक्टर धडकेत चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:30 IST

आझादनगर (मालेगाव) : शहरालगत महामार्गावरील संवदगाव फाट्याजवळ सोमवारी सकाळी १० वाजता खासगी लक्झरी बसने पुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरला ठोस दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर (मालेगाव) : शहरालगत महामार्गावरील संवदगाव फाट्याजवळ सोमवारी सकाळी १० वाजता खासगी लक्झरी बसने पुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरला ठोस दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला.  याप्रकरणी शेख आबीद शेख अन्वर (२३) रा. चिंचगव्हाण याने फिर्याद दिली. पवारवाडी पोलिसांनी लक्झरी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी (दि. २४) सकाळी १० वाजेच्या सुमारास माळधे शिवारातील संवदगाव फाट्याजवळ महामार्गावर खासगी बस (क्र. आरजे १८ पीए ८२८९) ही धुळ्याकडून नाशिककडे जात असताना चालकाने दुर्लक्ष करत ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यात ट्रॅक्टरचालक शेख अन्वर शेख गुलाब (५८) रा. चिंचवे जागीच ठार झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.तरुणावर कोयत्याने हल्ला; एकावर गुन्हाआझादनगर (मालेगाव) : दोन हजार रुपये दिले नाही म्हणून मुशरफ खान साबीर खान याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मजेखान सरदार खान (६९) रा. मदनीनगर यांनी फिर्याद दिली. जखमी मुशरफ खान साबीर खान याकडे आरोपी राहील याचे मोटारसायकलचे दोन हजार रुपये बाकी होते. बाकी असलेले पैसे मागण्यासाठी संशयित आरोपीचे वडील गेले असता त्यांना पैसे दिले नाही. या कारणावरुन शुक्रवारी दुपारी  ४ वाजता मुशरफ खान जैतुन हजीन मशीदजवळ त्यांच्यात वाद होऊन राहील याने हातातील कोयत्याने वार करून जखमी केले. त्यास धुळे येथे उपचारार्थ हलविण्यात आले. या प्रकरणी पवारवाडी पोलिसात राहील (पूर्ण नाव माहीत नाही) व त्याचा भाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जारवाल करीत आहेत.