नाशिक : आयपीएल सामन्यातील ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मॅचवर सट्टा खेळविणाऱ्या पंचवटी परिसरातील तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉप असा ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संशयितांवर जुगार अॅक्ट कायद्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आयपीएल सामन्यातील ट्वेंटी ट्वेंटी मॅचेस सुरू असून, परिसरातील एका लॉजमध्ये सट्टा खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी (दि. ३०) रात्री साडेनऊ वाजता पोलीस पथकाने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. संशयित महेश भोरे, नीलेश मोरे व म्हसरूळ येथील रोहन वाघ असे तिघे जण आयपीएल सामन्यातील मॅचवर सट्टा खेळवित असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता तिघे संशयित मिळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
आयपीएल सट्टाप्रकरणी पोलिसांचा लॉजवर छापा
By admin | Updated: May 2, 2017 17:19 IST