शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ पंतप्रधान म्हणाले, ‘थॅँक यू’!

By admin | Updated: September 11, 2014 00:32 IST

‘त्यांना’ पंतप्रधान म्हणाले, ‘थॅँक यू’!

नाशिक : देशाचे पंतप्रधान म्हटले की त्यांचा व्यस्त दिनक्रम, त्यांच्यावर रोजच्या रोज पडणारा समस्यांचा पाऊस, असंख्य निवेदने हे सारे डोळ्यांसमोर येते. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने पाठविलेल्या पत्राला उत्तर द्यायला त्यांना वेळ कोठून मिळणार, असाही विचार येतो; मात्र शहरातील एका आजीबार्इंना आलेल्या पत्राने हा विचार खोडून काढला आहे. या आजीबार्इंना दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नव्हे, तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पत्र पाठवून ‘थॅँक यू’ म्हटले आहे.महात्मानगर येथील संध्या माधव वैद्य असे या आजींचे नाव आहे. महात्मानगर येथील भजनी मंडळाच्या त्या सदस्य आहेत. या मंडळाअंतर्गत परिसरातील ज्येष्ठ महिला एकत्र येऊन विविध उपक्रम राबवित असतात. रोजच्या जगण्यातले अनुभव एकमेकींशी ‘शेअर’ केले जातात. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करावे आणि अयोध्येतील वादग्रस्त जागेबद्दल त्यांना विधायक सूचना करावी, असा विषय या मंडळात निघाला. वैद्य यांनी पुढाकार घेऊन तसे पत्र तयार केले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविणारे भारतमातेचे मंदिर उभारून त्याला आठ धर्मांच्या आठ पाकळ्या दर्शविणाऱ्या वास्तूची निर्मिती करावी, अशी सूचना करणारे पत्र त्यांनी लिहून काढले. तत्पूर्वी, पंतप्रधान झाल्याबद्दल मोदींचे अभिनंदनही करण्यात आले. संबंधित वास्तू कशी असावी, याचा आराखडाही पत्रावर साकारण्यात आला. हे पत्र ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, ७, रेसकोर्स, नवी दिल्ली’ या पत्त्यावर वैद्य यांनी पाठवून दिले. कामाच्या एवढ्या धबडग्यात पंतप्रधान या पत्राची कशी दखल घेणार, असा प्रश्न यावेळी अनेकांनी उपस्थित केला; मात्र दोन महिन्यांनी पंतप्रधान निवासातून थेट वैद्य यांच्या नावाने पत्र दाखल झाले. त्यात मोदींनी वैद्य यांना त्यांच्या सूचनेबद्दल हिंदी व इंग्रजीत धन्यवाद दिले आहेत. तसेच त्यांची स्वाक्षरीही आहे. (प्रतिनिधी)