शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा बॅँक शाखेत ठिय्या आंदोलन

By admin | Updated: April 25, 2017 01:50 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तत्काळ वेतन उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले.

 कळवण : जिल्ह्यातील इतर तालुक्यात शिक्षकांना फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यात आले; मग कळवण तालुक्यातील शिक्षकांवर अन्याय का, असा सवाल करीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कळवण शहर शाखेत तत्काळ वेतन उपलब्ध करून द्यावे या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो प्राथमिक शिक्षकांनी आपली वाहने रस्त्यावर पार्किंग केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची काहीकाळ कोंडी झाली होती. नोटाबंदीच्या घोषणेनंतर जिल्हा बँकेचे व्यवहार अडचणीत आले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकरी, नोकरदार वर्गालाही सहन करावा लागत आहे. यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचादेखील समावेश आहे. कळवण तालुक्यात माध्यमिक शाळेतील शिक्षकांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन जिल्हा बँकेकडून वितरित होत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे फेब्रुवारी, मार्च व एप्रिलचा शेवटचा आठवडा सुरु असल्याने जवळपास तीन महिन्यांचे वेतन थकल्याने शिक्षक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. घर कर्ज, वाहन कर्ज, मुलांच्या शिक्षणाची फी, खर्च तसेच घरखर्च असा करावा असा सवाल त्यांना सतावत आहे. शिक्षक सर्व बाजूंनी आर्थिक कोंडीत सापडले आहे. शिक्षकांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील शिक्षकांना फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यात आले, मग कळवण तालुक्यातील शिक्षकांवर अन्याय का, असा सवाल करीत आज कळवण येथील शहर शाखेत तत्काळ वेतन उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी शिक्षकांनीे अचानक बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. (वार्ताहर)