शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तळागाळातील माणसांचा गौरव

By admin | Updated: May 24, 2014 01:07 IST

रोटरी क्लब : व्यवसाय गुणगौरव पुरस्कारांचे वितरण

रोटरी क्लब : व्यवसाय गुणगौरव पुरस्कारांचे वितरणसिडको : सार्वजनिक क्षेत्रातील तळागाळातील लोकांचा शोध घेऊन, त्यांनी त्यांचे काम सांभाळून लोकांसाठी दिलेल्या योगदान सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ अंबडच्या वतीने व्यवसाय गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी सार्वजनिक क्षेत्रातील तळागाळात काम करीत असताना, आपले काम सांभाळून समाजासाठी योगदान देणार्‍यांचा सत्कार रोटरी क्लबच्या वतीने केला जातो. यंदाच्या वर्षीही अशा व्यक्तींना व्यवसाय गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाचे नाना दिवे, मनपा सफाई कर्मचारी चिंतामण पवार, तुलसी आय हॉस्पिटलचे वॉर्डबॉय गजानन गायकवाड, इलेक्ट्रीशियन संदीप भागवत, बँक ऑफ इंडियाच्या अंबड शाखेतील रोखपाल विजय पगारे, सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या जनसंपर्क अधिकारी शोभा वैद्य, सिडकोतील पोस्टमन हेमंत धारणकर आदिंचा समावेश आहे. या सर्वांना रोटरी क्लबचे प्रांतपाल दादा देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी रोटरी अंबडचे अध्यक्ष टी. एच. पाटील, सचिव तुषार चव्हाण आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राम सर, मेजर खोत, भास्कर पवार, जे. आर.वाघ, मेजन पिल्लाई, एन. टी. गाजरे, हरी कुलकर्णी, राजीव कर्णिक, सी. शांताराम, समिंदर गुलेरिया, बी. एस. पाटील, कॅप्टन तारिक आदि उपस्थित होते.यापुढेही असे उपक्रम...आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील गरीब व होतकरूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो. क्लबच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी आदि कार्यक्रमही घेतले जातात. यापुढेही असे उपक्रम राबविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.- तुषार चव्हाण, सचिव, रोटरी क्लब, अंबड