शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर

By admin | Updated: February 21, 2015 01:49 IST

महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर

नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर करताना आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहरातील जुन्या मिळकतींवर कराचा बोजा न टाकता नव्याने विकसित होणाऱ्या मिळकतींसाठी प्रचलित बाजारमूल्यानुसार (रेडिरेकनर) घरपट्टी आकारणीची शिफारस केली असून, एकूणच पाणीपट्टीत पहिल्या वर्षासाठी सुमारे ३० टक्के दरवाढ सुचविली आहे. त्याचबरोबर महापालिका औद्योगिक वसाहतींमध्ये सेवा-सुविधा पुरवत असल्याने कारखान्यांसाठीही करात दरवाढ प्रस्तावित केली आहे. महापालिकेला यामुळे सुमारे आठ कोटी ५० लाख रुपये वाढीव उत्पन्न अपेक्षित आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांना अंदाजपत्रक सादर केले. आयुक्तांच्या या अंदाजपत्रकानुसार, नवीन मिळकतींसाठी करआकारणीचे दर सुधारित बाजारमूल्यांनुसार प्रतिचौरस फुटाप्रमाणे आकारले जाणार आहे. आर.सी.सी. बांधकामांसाठी शहरी भागात सध्या निवासी दर ५० पैसे प्रति चौ. फूट असून, बाजारमूल्यानुसार तो पाच प्रकारच्या श्रेणीनुसार ५३ ते ८२ पैसे प्रति चौ. फूट इतका आकारला जाणार आहे. कौलारू घरांसाठी ३३ ते ६२ पैसे आणि व्यावसायिक व औद्योगिक मिळकतींसाठी सुमारे तीन रुपये प्रति चौ. फूट दर आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे. या नवीन मिळकतींच्या माध्यमातून महापालिकेला सुमारे ५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. सर्व्हे नंबरनुसार बाजारमूल्याचे दर आणि महागाई निर्देशांक लक्षात घेऊन मालमत्ता करातील असमोतल दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने १९९९ पासून घरपट्टीत वाढ केली नसल्याने उत्पन्नवाढीसाठी आयुक्तांनी ही करवाढ प्रस्तावित केली आहे. आयुक्तांनी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ८० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. याशिवाय आयुक्तांनी अंदाजपत्रकात सर्व मिळकतींसाठी पाणीपट्टीतही पहिल्या तीन वर्षांसाठी टप्प्याटप्प्याने वाढ सुचविली आहे. आयुक्तांनी आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या माध्यमातून ७७ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. सध्या घरगुती पाणीपुरवठ्यासाठी हजार लिटर्ससाठी पाच रुपये पाणीपट्टी आकारली जाते. सन २०१५-१६ या वर्षासाठी घरगुती पाणीपट्टीत हजार लिटर्ससाठी दीड रुपयांनी वाढ सुचविली असून, पहिल्या वर्षी ६.५० रुपये, सन २०१६-१७ या वर्षासाठी ७ रुपये आणि सन २०१७-१८ या वर्षासाठी ७.५० रुपये दरवाढ सुचविण्यात आली आहे. बिगर घरगुतीसाठी हजार लिटर्ससाठी सध्या २२ रुपये दर असून, तो पहिल्या वर्षी २७ रुपये असेल.