शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले शेतकऱ्यांना खतवाटप

By admin | Updated: September 3, 2014 00:33 IST

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले शेतकऱ्यांना खतवाटप

नाशिक : दमदार पाऊस झाल्यानंतर खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, रासायनिक खतांना त्यातही युरिया खताला मागणी वाढली आहे. युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या येवला तालुक्यातील तीन दुकानांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना युरिया खतांच्या गोण्यांचे वाटप करण्यात आले.लोकमतने यांसदर्भात २८ आॅगस्ट रोजीच ‘युरिया खताचा काळाबाजार जोरात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांच्या पिळवणुकीकडे तसेच खतांच्या कृत्रिम टंचाईकडे कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार कृषी विभागाने छापासत्र सुरू केले असून, आतापर्यंत तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. युरिया खत असूनही काही विक्रेते शेतकऱ्यांना खते देत नसल्याच्या तक्रारी येवला तालुक्यातून येताच कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी सहकारी अधिकाऱ्यासह अंदरसूल येथील सद्गुरू कृषी सेवा केंद्र व रघुनंदन कृषी सेवा केंद्र या दुकानांची तपासणी केली. या दुकानातील युरिया खतांची विक्री अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तसेच कृषी अंकुश अ‍ॅग्रो सर्व्हिसेस या कृषी निविष्ठा विक्री केंद्रातही युरियाचा साठा असल्याचे समजताच अभिजित जमदाडे यांनी खत विक्रेत्या दुकानादारास युरिया खतांची विक्री करण्याचे आदेश देऊन सुमारे २०० युरिया खतांच्या गोण्या शेतकऱ्यांना शासकीय दराने विक्री करण्यास भाग पाडले. यापुढेही साठेबाजी करून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून न देणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.(प्रतिनिधी)