शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

फेरनियोजनाची तयारी सुरू

By admin | Updated: September 5, 2015 00:36 IST

सिंहस्थ कुंभमेळा : तातडीच्या बैठकीत सज्जतेच्या सूचना

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीसाठी येणाऱ्या अधिकाधिक भाविकांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत स्नानासाठी येऊ देण्याच्या करण्यात आलेल्या फेरनियोजनानुसार मूलभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शुक्रवारी कुंभमेळ्याची तातडीची बैठक विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी फेरनियोजनाची बैठक झाल्यानंतर त्यात घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी बैठक घेतली. त्यात नाशिकरोडकडून येणारे तसेच मुंबई, धुळे, दिंडोरी, त्र्यंबककडून येणारे भाविक लक्ष्मीनारायण घाटावर स्नानासाठी येणार असल्याने त्यांची वाहतूक तसेच घाटावर अन्य सुविधा देण्याबाबत विचार करण्यात आला. क्षमतेपेक्षा जास्त भाविक याठिकाणी आल्यास त्यांना दसक व टाकळी घाटावर कसे नेता येईल याबाबतही चर्चा करण्यात आली. या ठिकाणी अधिक भाविक येणार असल्यामुळे वैद्यकीय सुविधा तसेच जलतरणपटूंची संख्या वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या. सेक्टर अधिकाऱ्यांनीही या नवीन बदलाची दखल घेऊन आपल्या हाताखालील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत या सूचना पोहोचवाव्यात त्याचबरोबर लक्ष्मीनारायण घाटाच्या मार्गावर शौचालय, मुतारींची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. शहरांतर्गत करण्यात येणाऱ्या पार्किंगच्या प्रश्नावरही यावेळी चर्चा झाली. इदगाह मैदानावरून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस सोडण्यात येणार असल्याने काही जागा बससाठी तर काही दुचाकी पार्किंगसाठी राखून ठेवता येईल काय यावरही चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)