शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावसह परिसर पोळा सणासाठी सज्ज

By admin | Updated: August 30, 2016 00:33 IST

संगमेश्वर : शेतकऱ्यांत अपूर्व उत्साह; मातीचा सर्जा-राजा बाजारात

संगमेश्वर : शेतकऱ्यांचे गाव म्हणून संगमेश्वर प्रसिद्ध आहे. मनमाड चौफुली, चंदनपुरी शिवार, द्याने, वडगाव आत्ताच्या कलेक्टरपट्टा भाग परिसरात या भागातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर बागायती व कोरडवाहू शेती होती. संगमेश्वरातील आत्ताचा सावतानगर, ज्योतीनगर, देवरे प्लॉट, काट्या मारुती, मोतीबाग नाका, मंडाळे बाग हा नागरी वस्तीच्या भागातही शेती होती. पाटपाण्यावर पिके घेतली जात होती.प्रत्येकाच्या शेतात बैलजोडी होती. या बैलांद्वारे शेतीची कामे करून घेतली जात होती. बैलपोळ्याचा सणही जोरदारपणे साजरा केला जायचा. शहरात राहूनही ग्रामसंस्कृती जपली जात होती. बैलांच्या अंगावर रंगीत झुली पांघरून त्यांना सजवून सायंकाळी वाजत-गाजत मिरवणूक निघायची. गावाच्या मारुती मंदिराला फेरी मारून नारळ वाहिली जायचे. मिरवणुका बघण्यासाठी आबालवृद्ध नागरिक महादेव मंदिर, मारुती मंदिर, सावता चौक, जुना होळी चौक, पाटीलवाडा, जगताप गल्लीत गर्दी करायचे, गुलालाची उधळण करीत कोणाची बैलजोडी आदि याची जणू काही स्पर्धाच असायची. गृहिणी दारात आलेल्या सर्जा-राज्याला ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य प्रेमपूर्वक खाऊ घालायच्या. घुंगरांच्या आवाजाने सर्व परिसर दुमदुमून जायचा. शेतगडी व शेतकरी मंडळी मांडीला मांडी लावत पुरणपोळीच्या मेजवानीवर ताव मारायचे. ज्यांच्याकडे बैलजोडी नसायची त्यांचे अंगणात जाऊन मग त्या घरातील गृहिणी सर्जा-राजाला ओवाळून पुरणपोळीचा घास भरवायच्या. काळ बदलला. शहराचे विस्तारीकरण झाले आणि सीमेंटची नगरे उभी राहिली. पूर्वीसारखा पाऊस पडेनासा झाला. शेती करणे जिकिरीचे झाले. शेतकामाला मजूर मिळेनात. अनेकांच्या जमीन बिनशेती झाली आणि नागरी वस्त्या उभ्या राहिल्या. यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरद्वारे शेती करणे सोपे झाले. त्यामुळे अनेकांना बैलजोडी ठेवणे परवडेना. बैलांऐवजी ट्रॅक्टर दारात दिसू लागले आणि सणावर त्यांचा परिणाम झाला आहे. पूर्वीसारखी बैलपोळ्याची रंगत कमी होऊ लागली. ती आजही दिवसेंदिवस कमी होत गेली आहे. आता फक्त जुन्या आठवणीच शिल्लक राहिल्यात. जिवंत बैलांऐवजी मातीच्या बैलांची पूजा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.(वार्ताहर)