शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या पाण्यावर खरिपाची तयारी

By admin | Updated: June 8, 2016 00:37 IST

नायगाव खोरे : भीषण पाणीटंचाईवर शेतकऱ्यांकडून उपाय; पावसाकडे नजर

 दत्ता दिघोळे  नायगावसतत पडणाऱ्या अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असताना कोणत्याही परिस्थितीत खरीप हंगाम उभा करण्यासाठी शेतकरी तयारीला लागल्याचे चित्र सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात दिसत आहे.नायगाव खोऱ्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. चालू वर्षी तर हे प्रमाण खूपच कमी झाल्याने परिसरातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटली. पर्यायाने खरिपापाठोपाठ रब्बीचे पीक जेमतेमच हाती आले. त्यातही बाजारात मिळालेल्या मातीमोल भावामुळे शेतकरीवर्गाला उत्पादन खर्चातही तोटा सहन करावा लागला.पर्यायाने डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याऐवजी त्याचा भार अधिक वाढल्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला. चालू वर्षी सर्वत्रच पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्याने परिसरातील पाणी पातळी खोलवर गेल्याने सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे शेतीला तर नाहीच पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करण्याची वेळ आली आहे.अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी नर्सरीमध्येच रोपांची बुकिंग केली आहे. तथापि, बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस पडेपर्यंत थांबणेच पसंत केले आहे. गेल्या १५ दिवसांपासून वातावरणात हवेचा गारवा वाढण्याबरोबर जोरदार वाऱ्याचे आगमन झाल्याने पावसाच्या अंदाजाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित दिवसेंदिवस बिघडत आहे. अशा अनेक गोष्टींवर मात करत शेतकरी आपली गुजराण करत आहे.बिकट परिस्थितीला तोंड देताना हताश झालेला शेतकरी पावसाच्या भरवशावर व कमी खर्चाचे बाजरी, सोयाबीन, भुईमूग ही पिके घेताना दिसत आहे.सध्या खरिपाच्या पिकांसाठी लागणाऱ्या रोपांना विकतचे पाणी देणे किती परवडणारे व यशस्वी होते हे आगामी काळातील वेळेवर पडणाऱ्या पावसाच्या भरवशावरच सर्व अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.