शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: September 30, 2016 01:45 IST

सप्तशृंगगड : मुख्य रस्त्यावरील अतिक्र मणे हाच मोठा अडथळा

कळवण : नवरात्रोत्सवात सप्तशृंगगडावर होणाऱ्या शारदीय महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रा महोत्सवासाठी देशभरातून लाखो देवीभक्त व भाविक येणार असल्याने रस्ता दुरु स्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.नवरात्र यात्रोत्सवात रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना, सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी १६ एकरचा वाहनतळ, २८० जादा बसेसचे नियोजन, सुरक्षा व्यवस्थेसाठी सुमारे ५५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत देण्यात आली.मुख्य रस्त्यावरील अतिक्र मणे दूर करून ते मोकळे होणे आवश्यक आहे. दुकानांवर जाळी, कापड लावण्यास प्रतिबंध करावा, यात्रोत्सवादरम्यान रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहन रस्त्यावरून जाऊ शकेल याची दक्षता घ्यावी, तलावाच्या ठिकाणी जीवरक्षक दलाचे स्वयंसेवक तैनात करण्यात यावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या. तलाव परिसरात प्रकाश व्यवस्था, विद्युतपुरवठा सुरळीत राहील यासाठी जोडण्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह दोन उपअधीक्षक, १० पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक, २५९ पोलीस कर्मचारी आणि २१६ हेड कॉन्स्टेबल तैनात करण्यात येणार आहेत. अग्निशमन दलाची दोन वाहने तयार ठेवण्यात आली असून, सुरक्षेसाठी हॉटेल्सची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांच्या मदतीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना ट्रस्ट कार्यालयात करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षात सर्व विभागांचे प्रत्येकी एक अधिकारी २४ तास उपलब्ध राहतील.बैठकीला तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, आगार व्यवस्थापक ए. आर. अहिरे, ट्रस्टचे विश्वस्त रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भिकन वाबळे, नेरकर, वैद्यकीय अधिकारी आर. एम. सपकाळे, संदीप बेनके, गिरीश गवळी, राजेश गवळी आदिंसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)