शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हॉकर्स झोनची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: December 20, 2015 00:05 IST

नव्या वर्षात सुरुवात : संघटनांकडूनही सकारात्मक प्रतिसाद

नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात हॉकर्स व नो हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले असून, त्याला अंतिम रूप दिले जात आहे. हॉकर्स व टपरीधारकांच्या संघटनांनीही बव्हंशी मुद्द्यांवर सहमती देत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नव्या वर्षाच्या प्रारंभी शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेमार्फत शहरात हॉकर्स व नो हॉकर्स झोन निश्चित करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. उपआयुक्त दत्तात्रेय गोतीसे यांच्या नेतृत्वाखाली हॉकर्स झोनचा आराखडा तयार करण्यात आला असून पोलीस, संघटना यांच्या हरकतीनंतर त्याला अंतिम रूप दिले जात आहे. लवकरच आयुक्तांसमवेत बैठक होऊन हॉकर्स झोनवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. जानेवारी २०१६ मध्ये शहरातील हॉकर्स झोन प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यास सुरुवात होतील. आतापर्यंत महापालिकेकडे साडेनऊ हजार फेरीवाल्यांनी बायोमेट्रिक नोंदणी केली असून, संबंधित नोंदणीकृत व्यावसायिकांना परवाने दिले जाणार आहेत. दरम्यान, हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे आणि उपआयुक्त दत्तात्रेय गोतीसे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली भूमिका मांडली. संघटनेने काही मुद्द्यांवर आक्षेप घेत चर्चा केली. त्यात प्रामुख्याने, संघटनेने सुचविलेल्या पर्यायी जागांचा विचार व्हावा, हॉकर्स झोनची अंमलबजावणी करताना समान न्यायाचे तत्त्व अवलंबिण्यात यावे, वहिवाट नसलेल्या जागांवर हॉकर्स झोन करू नये, विभागनिहाय हॉकर्स झोन्सची स्पष्टता करावी, बायोमेट्रिक नोंदणी पुन्हा सुरू करावी, जप्त केलेला माल परत मिळावा, उघड्यावरील मांस विक्रेत्यांसाठीही रचना करावी आदिंसह विविध सूचना मांडण्यात आल्या. यावेळी गोतीसे यांनी काही मुद्द्यांवर सहमती दर्शवित संघटनांनाही सहकार्याची भूमिका ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस सुनील संधानशिव, नारायण धामणे, किरण कासार, संजय बर्वे, नवनाथ लव्हाटे, पुष्पा वानखेडे, जया पाटील, जावेद शेख, अंजनाबाई धोंगडे, चंद्रकला पारवे, चित्रा मुसमाडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)