शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर येथे शासकीय यंत्रणेची सज्जता

By admin | Updated: August 5, 2016 00:27 IST

श्रावण : भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता; नियोजन पूर्ण

त्र्यंबकेश्वर : येथे श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे चार ते पाच लाख भाविक येथे येत असतात. यासाठी नियोजन करण्यासाठी नगरपालिका सभागृहात एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजया लढ्ढा होत्या.त्र्यंबकेश्वर येथे चारही सोमवारांबरोबरच संपूर्ण महिनाभर भाविकांचा ओघ राहणार असल्याने भाविक एसटी बस, खासगी वाहने अन्य प्रवासी बस आदिंचा वापर करून श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकला येत असतात. या गर्दीमुळे पोलीस यंत्रणेवर वाहनांचे नियोजन, कायदा आणि सुव्यवस्था राखणे आदि कामांसाठी सर्वात जास्त ताण येतो. हे सर्व करण्यासाठी जादा पोलीस बळ असावे लागते. सर्व खासगी वाहने खंबाळे, अंबोली, पहिने व तळवाडे वाहनतळावर थांबविण्यात येतील व तेथून बसने शहरात स्वतंत्रपणे एस.टी. बसने येता येईल. गावात कुठलेही वाहन आणता येणार नाही, मात्र एसटी बस शहरात येतील हे नियोजन फक्त श्रावण सोमवारी असेल. बाकी जशी गर्दी वाढेल तसे नियोजन असेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. परिक्रमा फेरी मार्गावरदेखील पुरेसा बंदोबस्त असेल. त्यामुळे केवळ हौसेखातर व फेरीच्या नावाखाली येणारे, नशिले, मादक पदार्थ सेवन करून ‘पिकनिक’साठी व छेडछाड करणाऱ्यांना चाप बसणार आहे.त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची आरोग्य व्यवस्था ग्रामीण रुग्णालयातर्फे घेण्यात येईल. पहिला, दुसरा आणि चौथ्या सोमवारी रुग्णालयात असलेल्या नियमित तीन वैद्यकीय अधिकारी-१, वैद्यकीय अधीक्षक-१ व अन्य कर्मचाऱ्यांमार्फत व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध असेल तर तिसऱ्या सोमवारी मात्र चार ठिकाणी फिरते आरोग्य पथक तैनात करण्यात येईल. या शिवाय पाणीपुरवठा सुरळीतपणे होईल. त्र्यंबक नगरपालिका व मजीप्रातर्फे थोडा क्लोरिनचा डोस वाढविण्यात येईल. (वार्ताहर) सर्व यंत्रणांनी सतर्क राहून श्रावण सोमवार यशस्वीपणे पार पाडावेत, असे आवाहन नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी केले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने कुशावर्त तीर्थावर जवळपास २५ जीवरक्षक असणार आहेत. त्यामुळे कुशावर्तावर सहसा बुडण्याचा धोका राहणार नाही. तरीदेखील भाविकांनी दोरीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. येत्या ११ आॅगस्टला सिंहस्थ पर्वकाल संपणार असल्याने पहिल्या सोमवारी, मंगळवारी व बुधवारी कदाचित भाविकांची सिंहस्थ स्नानासाठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. प्रशासनाने मात्र श्रावण नियोजनाची पूर्णपणे जय्यत तयारी केली आहे. यावेळी नगरसेवक, अधिकारी वर्ग उपस्थित होते.