शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती बंद

By admin | Updated: September 27, 2016 23:35 IST

अन्याय : ३ लाख ८७ हजार १२० अल्पसंख्याक विद्यार्थी वंचित

मालेगाव : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१५-१६ च्या नूतनीकरणात मंजूर लाभार्थींपैकी ३ लाख ८७ हजार १२० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. २०१४-१५ वर्षात ७ लाख १७ हजार ८९६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती.या योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रारंभीपासूनच तक्रारी आहेत. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलचा उपयोग करण्यात आला होता. यात डेटा भरताना व अपलोड करताना शाळांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. तक्रारींचे निराकरण होत नसल्याने राज्यभरातील शाळांनी नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती डेटाशीटमध्ये भरून सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी (आॅफ लाइन) शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाकडे दाखल केली होती. २०१४-१५ साली नूतनीकरण व नवीन मिळून ७ लाख १७ हजार ८९६ विद्यार्थ्यांना राज्यात शिष्यवृत्ती देण्यात आली होती. २०१५-१६ च्या संचालनालयाकडून प्राप्त नूतनीकरणाच्या यादीत राज्यातील विविध शाळांतील ३ लाख ८७ हजार १२० विद्यार्थ्यांची नावे गायब झाली आहेत. या प्रकरणी जबाबदार असलेल्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे संचालक नंदन बागरे यांची बदली करण्यात यावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून उर्वरित ३ लाख ८७ हजार १२० पात्र अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नूतनीकरण करून शिष्यवृत्ती देण्यात यावी, या वर्षासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस साजिद अहमद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व अल्पसंख्याक मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)