शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवीन रस्त्यावरच खड्डे

By admin | Updated: August 3, 2015 22:39 IST

हरिगिरी महाराज : निधी गेला कु ठे ?

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यावर खड्डे पडून तो खचला आहे. यासाठी आलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न करून सिंहस्थाच्या कामाकाजावर महंत हरिगिरी महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे.निलपर्वतावर जाण्याचा रस्ता असो अगर पिंपळदकडे जाण्याचा रस्ता असो, हा रस्ता चांगला केला आहे काय? रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत व बाजूने खचला आहे, तडे गेले आहेत. सहा शेडपैकी दोन शेड अजून अपूर्णच आहेत. या ठिकाणी संपूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. कामे निकृष्ट झाली आहेत. जिल्हाधिकारी म्हणतात, सर्व आखाड्यांपेक्षा जुन्या आखाड्यांसाठी पाच कोटींची कामे झाली आहेत. मग एवढा निधी कुठे खर्च केला, असा प्रश्न त्यांनी केला. आखाड्यातील पदाधिकाऱ्यांची, साधू-महंतांची व षड्दर्शन आखाडा परिषद पदाधिकाऱ्यांची निवड लोकशाही पद्धतीने होत असते. त्यामुळे माझ्या पदाची चिंता ग्यानदास यांनी करू नये. मी काही स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिरवून घेत नाही, असे मत जुना आखाड्याचे महंत तथा संरक्षक हरिगिरी महाराज यांनी ग्यानदासजींच्या वक्तव्यावर व्यक्त केले.विशेष म्हणजे, हरिगिरी महाराज राजस्थान येथे गेल्यावर ग्यानदास यांनी त्यांच्याविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांचे शनिवारी त्र्यंबक येथे आगमन झाल्यानंतर रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसच्या राज्यात चांंगली कामे झाली. लोकशाहीत सर्वांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणी चांगले काम केले तर त्याच्या कामाचे कौतुक करणे गुन्हा आहे काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. यापूर्वी मी मुलायमसिंह, मायावती, आजम खान यांच्याही कामाचे कौतुक केले होते. प्रशासन मला आलोचक समजते. त्यासाठीच मला एखाद्या खोट्या आरोपावरून ते तुरुंगात डांबायलादेखील मागेपुढे पाहणार नाही, असे शेवटी हरिगिरी म्हणाले.(वार्ताहर)