शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अभोणेकरांच्या नशिबी खड्डेच खड्डे

By admin | Updated: July 14, 2016 00:43 IST

प्रवासी वर्गात संताप : डागडुजी केवळ नावापुरतीच, सततच्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त

  संताप : डागडुजी केवळ नावापुरतीच, सततच्या अपघातांमुळे नागरिक त्रस्तकळवण : पावसाळा येताच रस्त्यांवरील खड्डे उघडे पडणे व ते वाढत जाणे ही समस्या नवीन नाही. हाच कित्ता यावर्षीही पहावयास मिळत असल्याने अभोणेकरांना त्याचे नवल वाटत नाही. अभोणा चौफुली परिसरातील रस्त्यावरील मोठंमोठे खड्डे आता अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रात्रीच्या वेळी पावसाच्या पाण्याने भरलेला खड्डा लक्षात येत नसल्याने धोका वाढला आहे. रस्ते खोदाईमुळे पडलेल्या चाऱ्या, खड्डे यात पावसाचे पाणी साचून अभोण्यातील रस्त्यांना गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे. पण ते नियमितपणे इमाने इतबारे केले जात नाही, अशी अभोणेकरांची तक्रार आहे. परिणामी दरवर्षी खड्ड्यांची मालिका वाढत चालली असून, जुन्या खड्ड्यांची लांबी व खोलीही वाढत आहे. यंदाही पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची विशेष दुरु स्ती झालेली नाही. रस्तादुरुस्ती न झाल्याने पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. अवजड वाहनांच्या रहदारीमुळे या रस्त्यावरील खड्ड्यांचा व्यास दररोज वाढत चालला आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहात असल्याने ते वाहनचालकांना दिसून येत नाही. परिणामी अपघाताची दाट शक्यता बळावली आहे. या रस्त्यावरून रोज शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात; पण सार्वजनिक बांधकाम विभाग हे खड्डे केव्हा बुजवतील , असा सवाल या मार्गावरील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना पडला आहे.निवेदन देऊन ही परिस्थिती ‘जैसे थे’. गेल्या महिन्यात येथील साई समर्थ ग्रुपच्या युवकांनी अभोणा चौफुलीवरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाला निवेदन दिले होते. त्यावेळेस खड्ड्यांवर तात्पुरता मुलामा देण्यात आला. परंतु आज रोजी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने संबंधित विभागाने लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास रस्त्यावर झाडे लावून रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा साई समर्थ ग्रुपच्या चेतन दिवाण, रोशन वाघ, कुणाल सोनवणे, दिलीप सोनवणे, गणेश सूर्यवंशी आदि कार्यकत्यांनी दिला आहे. (वार्ताहर)