शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचार्‍यांच्या पगारवाढीची शक्यता

By admin | Updated: May 16, 2014 00:33 IST

वेतनवाढ करार : ४५ टक्के पगारवाढीची कृती समितीची मागणी

वेतनवाढ करार : ४५ टक्के पगारवाढीची कृती समितीची मागणीनाशिक : वीज कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा वेतनवाढ करार मागील वर्षी १ एप्रिल रोजीच संपुष्टात आलेला आहे. नवीन करारवाढीसाठी कर्मचार्‍यांचा संघर्ष सुरू असून, कंपनीच्या वित्त अधिकार्‍यांनी काही मागण्यांवर संमती दर्शविल्याने कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांत वेतनवाढीची औपचारिक घोषणा होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीबाबत संघटना आणि व्यवस्थापनाच्या आत्तापर्यंत चार बैठका झालेल्या आहेत. या बैठकांमध्ये काही मुद्द्यांवर चर्चा होऊन सकारात्मक तोडगा निघालेला असल्याचा दावा संघटनेने केला आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या १६ मेनंतर कधीही होऊ शकतो. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये चैतन्य पसरले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत वित्त विभागाचे संचालक डी. डी. वाव्हळ यांनी मेडिक्लेम, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर आदि विषयांवर अनुकूलता दर्शविली असल्याचे संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी कळविले आहे. तांत्रिक कामगारांना स्वतंत्र वेतनश्रेणी मिळावी, तांत्रिक कामगारांच्या भत्त्यात वाढ करण्यात यावी, तांत्रिक कामगारांच्या अपग्रेडचा प्रस्ताव तीनही कंपन्यांत एकसूत्री असावा यासाठी आढावा घेऊन निर्णय घेण्याचा मानस व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. पगारवाढीच्या बैठकीत कशा प्रकारे वेतनवाढ द्यावी, त्यासाठी लागणारी रक्कम, टक्केवारी याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, तांत्रिक संघटनेने १ एप्रिल २०१३ च्या मूळ वेतनात ५० टक्के वाढीचा प्रस्ताव सादर केला; परंतु आठ संघटनांच्या कृती समितीत निर्णय घेऊन सर्वानुमते ४५ टक्के पगारवाढ करण्याची मागणी केली आहे. त्यावर या बैठकीत निर्णय होईल. पगारवाढीसाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन यांनी सांगितले.