शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कांदे नव्हे, बटाटे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या ...

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागत आहेत . सद्या केवळ बटाटे ५० रुपये किलो दराने विक्री होत असल्यामुळे बटाट्याचे महत्त्व वाढले आहे. कांद्याच्या भावापेक्षा दुप्पट भाव बटाट्याला मिळत असल्यामुळे कांद्यापेक्षा बटाटे अनेक वर्षांनंतर महाग झाले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता, तेव्हा शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सोयाबीन, मका आणि खरीप हंगामातील पिके काढल्यावर सर्वच शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली, जे शेतकरी कधीच भाजीपाला करत नव्हते. त्यांनीसुद्धा भाजीपाला लागवड केली, त्यामुळे पिकांचे क्षेत्र वाढले शिवाय कांदा रोपांची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतात काय लागवड करावी, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवड केली. भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ झाली. त्याचा फटका आज नगदी पिकाला बसत आहे.

पालेभाज्या कोणत्याही घेतल्यातरी अवघ्या पाच रुपये दरात इतकी स्वस्त जुडी मिळते, कोथिंबीर, शेपू, मेथी, पालक ५ रुपये जुडी तर वेलवर्गीय पालेभाज्या अवघ्या १० रुपये प्रतिकिलो दराने विकत आहेत. बटाटे आणि लसूण मात्र चांगला भाव खात आहे. ही दोन्ही पिके सध्या दुसऱ्या राज्यातून येत आहे. येणारा सर्व बटाटा आणि लसूण दुसऱ्या भागातून येत असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल बेभावात विक्री करावा लागत आहे.

कोट...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे आठवडे बाजारात किरकोळ विक्री केल्यास चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आठवडे बाजारातदेखील भाजीपाला कवडीमोल भावात विक्री होत असल्यामुळे खर्चदेखील वसूल होत नाही.

- युवराज कोटकर, शेतकरी, करंजगाव