शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ला विरोध करणारे ताब्यात

By admin | Updated: March 28, 2017 02:08 IST

घोटी : नागपूर - मुंबई प्रस्तावित समृद्धी महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असूनही शासनाने पोलीस बंदोबस्तात या महामार्गाच्या मोजणीचे काम सुरू केले.

घोटी : नागपूर - मुंबई प्रस्तावित समृद्धी महामार्गाला स्थानिक  शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असूनही शासनाने पोलीस बंदोबस्तात या महामार्गाच्या मोजणीचे काम सुरू केले. आज घोटी परिसरात औचितवाडी - कांचनगाव शिवारात महामार्गाच्या जमिनीसाठी मोजणी सुरू असताना महामार्गविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी मोजणीस घटनास्थळी हरकत घेतली. मात्र प्रांताधिकारी व पोलीस  यंत्रणेने या शेतकऱ्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेर काही स्थानिक शेतकऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेतले. प्रांताधिकारी व तहसीलदार मोजणीस्थळी तळ ठोकून होते. गेल्या दोन दिवसांपासून नागपूर - मुंबई या प्रस्तावित महामार्गाच्या भूसंपादनासाठी इगतपुरी तालुका हद्दीत जमीन मोजणीचे काम सुरू झाले. धामणगाव, कवडदरा या परिसरात मोजणी करून, मोजणीचे पथक आज औचितवाडी, कांचनगाव या परिसरात जमीन मोजणीसाठी दाखल झाले. (वार्ताहर)प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, इगतपुरी पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह दोन महिला पोलीस अधिकारी व राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या असा जवळपास ७० ते ८० पोलीस कर्माचाऱ्यांचा फौज फाटा मोजणीसाठी घटनास्थळी तैनात होता.महामार्ग विरोधी कृती समितीचे लक्ष्मण गव्हाणे, भास्कर गुंजाळ, अरु ण गायकर, दौलतराव दुभाषे आदिंसह कांचनगाव, औचितवाडी या शिवारातील शेतकऱ्यांनी या मोजणीस हरकत घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्या, असे आवाहन करून मोजणी बंद करण्याची विनंती केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मोजणीस्थळी येऊन मोजणी बंद करण्याबाबत पोलिसांना विनंती केली. पोलीस अधिकारी घोगरे यांनीही शेतकऱ्यांची समजूत काढत तुम्ही शासन व लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून दाद मागण्याचे नमूद केले. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी कृती समितीचे भास्कर गुंजाळ, अरु ण गायकर, दौलतराव दुभाषे, रामदास गव्हाणे, बंटी गव्हाणे, गोरख दुभाषे, हनुमान दुभाषे, गुरु नाथ दुभाषे, विजय कडू आदिंना पोलीस गाडीत बसवून ताब्यात घेतले.