शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासासाठी जाणारे कार्यकर्ते ताब्यात

By admin | Updated: February 22, 2015 00:28 IST

मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासासाठी जाणारे कार्यकर्ते ताब्यात

नाशिक : पुरोगामी विचारांचे डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या पाठोपाठ कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाने पुरागामी चळवळीतील कार्यकर्ते संतप्त झाले. त्याचे तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यातच गो बॅकचे नारे देणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या नुतन इमारतीच्या उदघाटनासाठी येऊन फडणवीस यांना जाब विचारण्यासाठी प्रयत्न केला. तथापि, पोलीसांनी कार्यकर्त्यांनी सौम्य बळाचा वापर करून आंदोलकांना अडकवले. आणि झटापट करून संबंधीतांना ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्यात नेल्याने पुढिल संघर्ष टळला.हल्लेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेले कॉम्रेड पानसरे यांचे शुक्रवारी रात्री निधन झाल्यानंतर शनिवारी सकाळी त्याचे तीव्र पडसाद उमटले. दाभोळकर यांच्या हल्लेखोरांपर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.या हल्लेखोरांचा शोध व अटकेच्या मागणीसाठी डावी आघाडी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी विचाराच्या विविध संघटना व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शनिवारी हुतात्मा स्मारकापासून मोर्चा काढला़ शिवाजीरोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री परत जा अशा घोेषणा दिल्या. कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि ते मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडे रवाना झाले. तथापि, पोलीसांनी मुख्यमंत्री येण्याच्या आतच धावपळ केली. मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार व पोलिसांच्या निषेधार्थ घोषणाबाजी, तसेच काळे झेंडे दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करीत पोलिसांनी ३० जणांना ताब्यात घेतले़ आणि मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडल्यानंतर सोडून दिले.तत्पुर्वी ‘दाभोलकर-पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, महाराष्ट्र पोलीस मुर्दाबाद, मुख्यमंत्री राजीनामा द्या, धर्मवाद हो बरबाद, धर्म के नाम पर रक्तपात नही चलेगा’ अशी घोषणाबाजी करीत हुतात्मा स्मारकापासून हा निषेध मोर्चा निघाला़ डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ यांची हत्त्या करण्यात आली. या हत्त्येस अठरा महिने उलटूनही हल्लेखोरांचा तपास लागलेला नाही़ याबरोबरच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरही गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला़ मात्र अद्यापही या दोघांचे मारेकरी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत़ या दोन्ही हल्ल्यांमध्ये साम्य असून धर्मांध, प्रतिगामी, सनातन प्रवृत्ती यांचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी यावेळी कार्यकर्ते करीत होते़ या मोर्चामध्ये डाव्या आघाडीचे अ‍ॅड़ तानाजी जायभावे, अ‍ॅड़ मनीष बस्ते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे, लक्ष्मीकांत कावळे, ‘आप’चे जितेंद्र भावे, प्रा़ इंदिरा आठवले, शशी उन्हवणे, शांताराम चव्हाण, प्रियदर्शन भारतीय यांच्यासह सुमारे पन्नास ते साठ कार्यकर्ते सहभागी झाले होते़