शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे रोखण्यासाठी कुली सरसावले

By admin | Updated: July 30, 2016 00:56 IST

मनमाड : पोलीस आणि रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

मनमाड : शहरात रात्रीच्या अंधारात दुकाने फोडण्याच्या वाढत्या घटनांबाबत लोकमतमधून ‘वाढत्या चोऱ्यांमुळे घबराट’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रात्रीची गस्त वाढवण्याबरोबरच चोरट्यांना पसार होण्यासाठी सुकर असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकाकडे पोलिसांनी लक्ष वाढवले आहे.रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकावर कुलींना संशयास्पद प्रवासी आढळल्यास ते पोलिसांना सतर्क करणार असल्याचा निर्णय आज कुली लोकांनी शहर पोलीस ठाणे, लोहमार्ग पोलीस ठाणे, रेल्वे सुरक्षा बल अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ‘सारी दुनियाका बोझ हम उठाते है’ असे म्हणणाऱ्या कुली लोकांनी शहरातील गुन्हे रोखण्यास मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.शहरातील वाढत्या चोऱ्यांबाबद तपासलेले सीसीटीव्ही फुटेज व अन्य चौकशीतून बहुतांश चोरटे हे बाहेरगावहून येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मनमाड हे रेल्वेचे जंक्शन असल्याने रात्रीच्या वेळी दर अर्ध्यातासाला येणारी गाडी चोरट्यांना पसार होण्यासाठी सोयीस्कर होत आहे. या दृष्टिकोनातून पोलिसांनी रेल्वे स्थानकाकडे लक्ष व वाढवले आहे. रात्रीच्या वेळी स्टेशन परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. यामधे मदत व्हावी या हेतूने मनमाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुंडलिकसपकाळे यांच्या पुढाकारातून मनमाड रेल्वे स्थानकावर अधिकारी व कुली यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी रेल्वे गाड्या आल्यानंतर किंवा फलाटावर संशयास्पद प्रवासी आढळल्यास पोलीस प्रशासनाला कळविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी स्टेशन प्रबंधक एस. बी. सिंग, रेसुब निरीक्षक के. डी. मोरे, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर भावल,उपनिरीक्षक रजनीश यादव, आर. के. मिना, एम.के. सैनी, मुकादम मधुकर गिते, शेख मुक्तार यांच्यासह कुली उपस्थित होते. (वार्ताहर)