शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रेंजसाठी अंगणवाडी सेविकांना पोर्टेबिलिटीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:44 IST

गावपातळीवर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना पूर्वी संपूर्ण गावाच्याच आरोग्याची काळजी वाहावी लागत असे. त्यासाठी अकरा प्रकारचे रजिस्टर अद्ययावत ठेवण्याची ...

गावपातळीवर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना पूर्वी संपूर्ण गावाच्याच आरोग्याची काळजी वाहावी लागत असे. त्यासाठी अकरा प्रकारचे रजिस्टर अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यात गावातील प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती, कुटुंबातील सदस्य, घरातील लहान मुले, किशोरवयीन मुले, मुली, गरोदर माता, स्तनदा मातांची माहिती यामध्ये दर दिवशी भरण्याचे अवघड काम केले जात होते. त्यापासून सुटका म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना अ‍ॅण्ड्राॅईड मोबाइल दिले. या मोबाइलमध्ये ‘कॉमन अ‍ॅप्लिकेशन सिस्टम’ नावाचे अ‍ॅप असून, या अ‍ॅपमध्ये ऑनलाइन माहिती भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागात प्रारंभी मोबाइलच्या रेंजचा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु गावोगावी कंपन्यांनी मोबाइल टॉवर उभारल्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी सुटला असला तरीदेखील येणाऱ्या अडचणी पाहता, मोबाइलची पोर्टेबिलिटी करून त्यांनी त्यावर उतारा शोधला आहे.

--------

खंडित वीज पुरवठ्याचा त्रास

मोबाइलवरच अंगणवाडी सेविकांचे ऑनलाइन काम केले जात असले तरी, बऱ्याच वेळा गावातील खंडित वीज पुरवठ्याचा त्रास त्यांना सोसावा लागतो. वीज पुरवठा नसल्यास मोबाइल टॉवर बंद पडतो, तसेच मोबाइल चार्जिंग करणेही अवघड होऊन बसते.

-------

कामकाजात सुसूत्रता

एकात्मिक बाल विकास विभागाने प्रत्येक अंगणवाडी सेविकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्यामुळे कामकाजात गतिमानता तसेच सुसूत्रता व अचूकता आली आहे. थेट राज्यापर्यंत गावाची माहिती पोहोचू लागली आहे.

-दीपक चाटे, महिला बाल कल्याण अधिकारी

-------------------------------

अकरा प्रकारची कामे करावी लागतात

* गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवणे

* गावातील शून्य ते दोन व दोन ते सहा वयोगटातील बालकांची नोंदणी करणे, या बालकांचे दरमहा वजन घेणे, कुपोषित मध्यम, तीव्र गटात त्यांचे वर्गीकरण करणे.

* गावातील गरोदर महिलांची माहिती संकलित करून त्यांना तिसऱ्या महिन्यांपासूनच देखरेखीखाली ठेवणे, स्तनदा महिलांना पोषण आहार देणे.

* कुपोषित बालकांना पोषण आहार पुरविणे, त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करणे.

* पोषण आहाराच्या नोंदी ठेवणे, लाभार्थी निश्चित करणे व आहार वाटपावर नियंत्रण ठेवणे.