शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत लोकसंख्या ९८ लाख

By admin | Updated: July 29, 2016 01:22 IST

आरोग्याधिकाऱ्याचे अजब तर्कट : घंटागाडीचा सदोष प्रस्ताव

 नाशिक : सन २०११ च्या जनगणनेनुसार नाशिकची लोकसंख्या १४ लाख ८५ हजार इतकी नोंदविली गेली आहे आणि आजच्या घडीला शहराची लोकसंख्या अंदाजे १८ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. लोकसंख्येचा दर लक्षात घेता पाच वर्षांत फार, तर शहराची लोकसंख्या ३५ ते ४० लाखावर जाऊ शकेल परंतु महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्याने घंटागाडीच्या ठेक्याचा प्रस्ताव तयार करताना शहराची लोकसंख्या पाच वर्षांत तब्बल ९८ लाखांवर जाऊन पोहोचणार असल्याचे अजब तर्कट मांडले असून त्याच आधारे कचरा संकलनाची आकडेवारी काढत घंटागाडीचा सदोष प्रस्ताव तयार केला आहे. आता असे तर्कट मांडण्यात आरोग्याधिकाऱ्याचे गणित कच्चे आहे की त्यापाठीमागे वेगळेच ‘गणित’ आहे याची खमंग चर्चा महापालिका वर्तुळात चर्चिली जात आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाच वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल १७६ कोटी रुपयांचा घंटागाडीच्या ठेक्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सदर घंटागाडी ठेक्याच्या मूळ प्रस्तावात आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी प्राप्त निविदादरानुसार ५ वर्षांकरिता अपेक्षित खर्च ढोबळपणे मांडला आहे. त्यात सहाही विभागातील लोकसंख्या गृहित धरून पाच वर्षांत किती टन कचरा संकलन होऊ शकेल याचीही अंदाजे आकडेवारी देण्यात आली आहे. परंतु अंदाज वर्तवतानाही त्यात वास्तवाला स्पर्श न करण्याचा पराक्रम आरोग्याधिकाऱ्याने केला आहे. आरोग्याधिकाऱ्यांनी प्रस्तावात पाच वर्षांनंतर नाशिक पूर्व विभागाची लोकसंख्या १६ लाख ६९ हजार ७३०, पश्चिम विभागाची १३ लाख ४५ हजार ३५८, पंचवटी विभागाची १९ लाख २४ हजार २६५, नाशिकरोड विभागाची १८ लाख २५ हजार ६६५, सिडको विभागाची १७ लाख ३२ हजार ३७५ आणि सातपूर विभागाची १३ लाख ६४ हजार १५ याप्रमाणे लोकसंख्या होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे, तर सहाही विभागांत सर्वसाधारणपणे पाच वर्षांत घनकचरा सुमारे ११ लाख टन इतका संकलित होणार असल्याचे म्हटले आहे. या आकडेवारीवरूनच दराची निश्चिती करण्यात आलेली आहे. पाच वर्षांत शहराची लोकसंख्या ९८ लाख ६१ हजार होण्याचा अंदाज आरोग्याधिकाऱ्याने वर्तविल्याने नाशिककरांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येऊन ठेपेल. आरोग्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करताना आजच्या लोकसंख्येला पाचने गुणले आणि लोकसंख्या ९८ लाखांवर नेऊन पोहोचविली. त्यामुळे संपूर्ण प्रस्तावच सदोष झाला. महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्याने लोकसंख्या वाढीचे अजब तर्कट मांडत शासनाच्या आरोग्यविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन संकल्पनेचा ‘कचरा’केल्याची रंजक चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.