शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन प्रभागांसाठी २८ आॅगस्टला मतदान

By admin | Updated: July 29, 2016 01:03 IST

पोटनिवडणूक कार्यक्रम : आचारसंहिता लागू

नाशिक : महापालिकेच्या नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब) मधील रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, सोमवार, दि. २८ आॅगस्ट २०१६ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दोन्ही प्रभागांसाठी निवडणूक आचारसंहिताही मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नगरसेवकपद भूषविण्यासाठी आता किती इच्छुक पुढे येतील याबाबत उत्सुकता वाढली आहे.सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत नाशिकरोड विभागातील मनसेचे प्रभाग क्रमांक ३५ (ब)चे नगरसेवक शोभना संजय शिंदे आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब)चे नगरसेवक नीलेश तुकाराम शेलार यांनी पक्षादेश डावलून मतदान केल्याने मनसेने दोन्ही नगरसेवकांविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे सदस्यत्वपद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी दोन्ही नगरसेवकांना अपात्र घोषित केले होते. दरम्यान, दोन्ही अपात्र नगरसेवकांनी दि. ४ एप्रिल २०१६ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत न्यायालयाकडून कोणताही स्थगिती आदेश प्राप्त न झाल्याने अखेर पोटनिवडणुकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या महिनाभरापासून महापालिकेमार्फत दोन्ही प्रभागांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राबविला जात होता. त्याबाबत प्राप्त हरकतींवर बुधवारी (दि.२७) सुनावणीही घेण्यात आली आणि गुरुवारी राज्य निवडणूक आयुक्तांनी दोन्ही प्रभागातील रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार, दि. २८ आॅगस्टला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, दि. २९ आॅगस्टला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी, दि. २ आॅगस्ट रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून, दि. २ ते ९ आॅगस्ट या कालावधीत उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी मात्र नामनिर्देशनपत्राची विक्री व स्वीकृती होणार नाही. दि. १० आॅगस्ट रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाईल. दि. १२ आॅगस्टपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. दि. १३ आॅगस्ट रोजी चिन्ह वाटप केले जाणार असून, आवश्यकता भासल्यास दि. २८ आॅगस्टला मतदान घेतले जाणार आहे. उमेदवारांना प्रचारासाठी पंधरा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने राजकीय पक्षांमधील इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या असून, सहा महिन्यांसाठी मिळणाऱ्या नगरसेवकपदासाठी ही पोटनिवडणूक मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रंगीत तालीम म्हणूनही पाहिले जाणार आहे. (प्रतिनिधी)