शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:17 IST

या निवडणुकीत ५५ ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध निवडून आलेल्या असून, १,६२२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया ...

या निवडणुकीत ५५ ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध निवडून आलेल्या असून, १,६२२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ४,२२७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मतदान केंद्राचा ताबा घेतला असून, सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. अखेरच्या अर्ध्या तासात कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांना सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून मतदान करता येणार आहे. या निवडणुकीत ६,११,६५४ स्त्री मतदार, तर ६,७२,४५३ पुरुष मतदार, असे एकूण १२ लाख ८४ हजार १०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दरम्यान, या निवडणुकीसाठी ३८९ अधिकारी, तर ९,७६० इतके कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. महामंडळाच्या ६१ बसच्या माध्यमातून, तसेच ४०२ जीप आणि १२६ मिनी बसच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर निवडणुकीचे साहित्य रवाना करण्यात आले. मतदानासाठी २,५६० कंट्रोल युनिट, तर तितकेच बॅलेट, असे एकूण ५,१२० युनिटस्‌ १,९५२ मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. सायंकाळच्या सुमारास संवेदनशील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात पोलिसांनी संचलन केले.