शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर राजकीय दबाव खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST

नाशिक : शहरात विनापरवानगी मोर्चे काढणे, आंदोलने करणे हे कोणत्याही पातळीवर सहन केले जाणार नाही. कुठल्याही राजकीय व्यक्तीने शहर ...

नाशिक : शहरात विनापरवानगी मोर्चे काढणे, आंदोलने करणे हे कोणत्याही पातळीवर सहन केले जाणार नाही. कुठल्याही राजकीय व्यक्तीने शहर पाेलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आणता कामा नये. लोकप्रतिनिधी आणि पोलीस हे दोन्हीही जनसेवक आहे, यामुळे राजकीय व्यक्ती व त्यांचा पदाचा पोलीस नेहमीच आदर करतील. मात्र, त्यांचा दबाव खपवून पोलीस खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिला.

नाशिक पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि.४) झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान, ‘पोलीस विरुद्ध आमदार’ असा वाद उभार राहत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, पाण्डेय यांनी स्पष्टवक्ता या आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, पोलीस हे शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस रस्त्यावर आहे. पोलीस हाही माणूस असून, त्याचे मनोधैर्यही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाईमध्ये विनाकारण हस्तक्षेप करणे, तसेच आपल्या राजकीय पदाचा वापर करत कोणीही राजकीय व्यक्ती जर दबाव निर्माण करत असेल, तर तो कदापी सहन केला जाणार नाही. शहरात ‘अवैध धंदे सुरू आहे...’ असे म्हणणे सोपे आहे. कारण त्यास खूप काही मोठा आधार लागत नाही आणि अवैध धंद्यांना पोलिसांनी परवाने दिलेले नाही, हे लक्षात घ्यावे. यामुळे रोलेट, मटका, जुगार, दारूविक्री याबाबतचे परवाने ज्या महसूल यंत्रणेने दिले आहेत, ते त्यांनी तपासावे, अशी सूचनाही पाण्डेय यांनी यावेळी बोलताना केली.

गुन्हेगाराच्या बचावासाठी महिलांचा कोरोनाच्या काळात थेट पोलीस ठाण्यावर विना परवानगी माेेर्चा आणला, म्हणून आमदार देवयानी फरांदे यांच्यावर कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामध्ये कुठलेही गैर नाही, कायदा हा सर्वांना समान आहे. कारवाई झाल्यानंतर शहरात अवैध धंदे सर्रास सुरू आहे, हे सांगणेही चुकीचे असल्याचे पाण्डेय यावेळी म्हणाले.

--इन्फो--

दबावाखाली नव्हे, तर पोलीस मॅन्युअलप्रमाणे कामकाज

शहर पोलीस आयुक्तालयाचे कामकाज हे कोणत्याही राजकीय दबावाखाली चालत नाही, तर ते पोलीस मॅन्युअलप्रमाणे सुरळीतपणे चालू आहे, यामुळे यापुढे कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव १३ पोलीस ठाण्यांपैकी कोठेही सहन केला जाणार नाही, असे पाण्डेय यांनी ठणकावून सांगितले. फरांदे यांच्याशी चर्चा करण्यास मी कधीही नकार दिलेला नाही, असेही यावेळी पाण्डेय यांनी बोलताना स्पष्ट केले.

---

दीपक पाण्डेय यांचा सिंगल कॉलम फोटो वापरावा