शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 8, 2016 01:38 IST

पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न

 नाशिकरोड : तपोवनरस्त्यावर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपनगर पोलीस ठाण्याचे हवालदर व्ही. आर. घोलप हे सोमवारी रात्री तपोवन रस्त्यावर बॅरिगेटस् लावलेल्या ठिकाणी नाकाबंदी ठिकाणी कार्यरत होते. यावेळी नाशिक-पुणे महामार्गावरील आयनॉक्स चित्रपट गृहामार्गे रिक्षा (एमएच १५ ईएच १७४४) हिच्यामधील संशयित रिक्षाचालक सागर शिवाजी नाईक, नितीन अशोक वाडकर, रोहित नाईक, रोहित हळदणकर व ज्ञानेश्वर वाघमारे सर्व रा. हिरावाडी, पंचवटी हे येत असतांना त्यांना पोलीस हवालदार घोलप यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र रिक्षाचालक सागर नाईक याने घोलप यांच्या अंगावर रिक्षा घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही संशयितांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. बुधवारी त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)