पंचवटी विशेष प्रतिनिधी - पंचवटी परीसरातील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेल करवली येथे चालणारा कुटनखान्यावर पोलिसांनी छापा टाकत एक बंगाली तरुणी तसेच हॉटेल मध्ये विनापरवाना अवैधरित्या विक्री साठी ठेवलेली दारूही जप्त करण्यात आली आहे.तसेच या हॉटेल शेजारीअसलेल्या हॉटेल चालकालाही सज्जड दम भरण्यात येणार आला.बुधवार (दि.१०) ला सायंकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास पंचवटी परीसरातील मुंबई आग्रा महामार्गा लगत हॉटेल करवली यांनी ठिकाणी अवैद्यरित्या चालत असलेला कुंटनखाना चालत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली. त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर ,पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पुजारी,महिला पोलीस कर्मचारी तसेच पंचवटी गुन्हे दाखल शोध पथक घेऊन छापा टाकला
हॉटेल करवलीच्या कुटनखान्यावर पोलिसांचा छापा
By admin | Updated: May 10, 2017 22:44 IST