शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएचआर’ घोटाळ्यात पोलिसांनी गोळा केले ट्रकभर पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरून पुरावे गोळा केले आहेत. त्यात प्रामुख्याने जळगावमधील वेगवेगळ्या १२ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. याबरोबरच औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

‘बीएचआर’संबंधित कारवाईसाठी पुणे पोलिसांनी संपूर्ण गुप्तता पाळली होती. याप्रकरणी डेक्कन, पिंपरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडे ३ गुन्हे दाखल आहेत. दोन पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, २५ सहायक निरीक्षक आणि १०० पोलीस कर्मचारी असा पुणे, पिंपरी आणि ग्रामीण पोलिसांच्या या मोठ्या पथकाने जळगावमध्ये जाऊन गेल्या शुक्रवारी सकाळीच छापे घातले होते. त्यात जळगावमधील १२ ठिकाणी एकाचवेळी हे छापे घालण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीवरून इतर ठिकाणी तसेच औरंगाबाद येथे झडत्या घेण्यात आला.

सुमारे एक ट्रक भरून मिळालेल्या या कागदपत्रांची छाननी सध्या सुरू आहे. त्यामध्ये ठेवीदारांच्या पावत्या, कर्जदारांचे शपथपत्रे, अनेक बनावट शिक्के असे साहित्य आहे. त्यातील कोणते बँकेने केलेली दस्तऐवज आहेत व कोणते आरोपींनी बेकायदेशीरपणे लोकांकडून करून घेतलेली कागदपत्रे आहेत, ही कागदपत्रे लिलावामधील आहेत की तारण म्हणून घेतलेली आहेत, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. तसेच अटक केलेल्या आरोपीचे जबाब नोंदवून घेण्याचे कारण स्वतंत्र पथक करीत आहेत.

चौकट

ठेवीदारांकडून पुणे पोलिसांचे स्वागत

पुणे पोलिसांच्या कारवाईचे बीएचआरचे ठेवीदार, गुंतवणूकदार, ग्राहक यांच्याकडून जोरदार स्वागत केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही न्यायासाठी प्रयत्न करीत आहोत. पोलिसांच्या कारवाईने आम्हाला न्याय मिळण्याची आशा वाटू लागल्याचे ठेवीदार म्हणू लागले आहेत. ‘बीएचआर’शी संबंधित अनेकजण आर्थिक गुन्हे शाखेत येऊन पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करीत आहेत.