शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घेरावाच्या भीतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांचा वेढा

By admin | Updated: May 6, 2017 01:22 IST

सायखेडा : शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिलेली धडक व पालकमंत्र्यांसमक्ष उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यालयालाच सशस्त्र वेढा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : दोन वर्षांपूर्वी गंगापूर धरणाच्या पाणीप्रश्नावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिलेली धडक व पालकमंत्र्यांसमक्ष उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याच्या धमकीची दखल घेत पोलिसांनी संपूर्ण कार्यालयालाच सशस्त्र वेढा दिला. निफाड तालुक्यातील अघोषित भारनियमन व पाणीपुरवठा योजनांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आमदार अनिल कदम यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांना आवाहन करून ‘चलो जिल्हाधिकारी कार्यालय’ अशी हाक दिली, त्याचबरोबर जिल्हाधिकारी तसेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनीही जाहीर केल्यामुळे त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दक्ष राहण्याबाबत अवगत केले होते. त्यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेऊन मुख्य प्रवेशद्वारावर सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला. साधारणत: अकरा वाजेनंतर आमदार अनिल कदम यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात जमला, त्यावेळी मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना अडविण्याची भूमिका घेतली. वीज व पाण्याचा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांकडून कायदा हातात घेण्याच्या भीतिपोटी पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्तांसह पोलीस निरीक्षकांनी या ठिकाणी तळ ठोकला तर साध्या वेशातील पोलीस कर्मचारीही तैनात करून शेतकऱ्यांवर लक्ष ठेवून होते. दंगा काबूत आणणाऱ्या पथकालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. आमदार कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फक्त निवेदन देण्यात येईल असे जाहीर करूनही पोलीस खबरदारी घेऊन उभे होते.