शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांना तक्रारीची प्रतीक्षा

By admin | Updated: February 9, 2016 23:04 IST

पोलीस आयुक्तांना तक्रारीची प्रतीक्षा

नाशिक : सराईत गुन्हेगारांसोबत एकाच व्यासपीठावर बसून ‘पोलीस स्थापना दिवस’ साजरा करणे, दंडवसुलीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची गचांडी पकडून सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देणे, चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून जबर मारहाण करणे यांसारखी कृत्ये करूनही पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून अभय दिले जाते़ याचे कारण म्हणजे पोलीस आयुक्तांच्या लेखी नागरिकांच्या या अधिकाऱ्यांबाबत तक्रारी नाहीत़ कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सर्वसामान्य नागरिक तक्रार करणार कसे हा प्रश्नच आहे़पोलीस आयुक्तालयात बदलीनंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली़ काही महिने होत नाही तोच उपनगरला तडकाफडकी बदली केली जाते़ उपनगरला तर निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागते़ मात्र पुन्हा इंदिरानगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती होते़ सराईत गुन्हेगारांसोबत पोलीस रेझिंग डेचा कार्यक्रम, पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आलेल्या महिलेसोबत असभ्य भाषेत बोलणे, शाळकरी मुलास मारहाण केली जाते़ विशेष म्हणजे महिला असभ्य वर्तनप्रकरणी नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणीही केली होती़गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत केवळ बेशिस्त वाहतूकदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी खुद्द वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रस्त्यावर उतरावे लागते़ कारण या ठिकाणी गुन्हेच घडत नसल्याने तपासाचे कामच नाही़ वास्तविक पाहता २०१५ चे निम्म्याहून अधिक गुन्ह्यांची उकल झालेली नाही़ या ठिकाणी अवैधपणे ‘स्पा’ व्यवसाय सुरू असल्याचे सहायक पोलीस आयुक्तांनी मारलेल्या छाप्यामुळे समोर आले होते़ याचाच अर्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किती कर्तव्यदक्षपणे काम करीत आहेत याची कल्पना यावी़सरकारवाडा पोलीस ठाण्यात बोलावून एका युवकास जबर मारहाण केल्यानंतर त्यास पोलिसांविषयी काही तक्रार नसल्याचा जबाब लिहून घेतल्याचा कारनामाही पोलिसांनी केला आहे़ सामान्य पोलीस कर्मचाऱ्याविषयी तक्रार आल्यानंतर निलंबनाची कारवाई करणारे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबाबत नागरिकांच्या तक्रारीची वाट पाहतात, हे अनाकलनीय असल्याची चर्चा आहे़ (प्रतिनिधी)