शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पेठरोड गोळीबारातील संशयितांना पोलीस कोठडी

By admin | Updated: July 3, 2017 01:09 IST

नाशिक : गोळीबार केल्यानंतर फरार झालेले तिघांना जगदंबा लॉजमधून ताब्यात घेतले़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीतील भरेकरी व्यवसाय करणारा संदीप लाड या तरुणावर हप्ता न दिल्याच्या कारणावरून गोळीबार केल्यानंतर फरार झालेले संशयित शेखर निकम, केतन निकम व विशाल भालेराव या तिघांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी औरंगाबाद शहरातील जालनारोडवर असलेल्या जगदंबा लॉजमधून ताब्यात घेतले़ या तिघांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़, तर यातील चौथा संशयित संदीप पगारे यास सोमवारी (दि़३) पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे़पेठरोडवरील डॉ. बच्छाव हॉस्पिटलशेजारील हॉटेलमध्ये मित्रांसमवेत गुरुवारी (दि. २९) चहा पिण्यासाठी गेलेल्या फुलेनगर येथील संदीप अशोक लाड (२९) याच्यावर निकम बंधू, भालेराव व पगारे या संशयितांनी गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती़ या घटनेनंतर फरार झालेल्या तिघांच्या शोधासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदर आप्पा गवळी, भूषण रायते, सतीश वसावे, मोतीराम चव्हाण, सचिन म्हसदे, जितू जाधव, निंबाळकर, बस्ते यांनी औरंगाबाद येथील लॉजमधून या तिघांना अटक केली़ पोलिसांनी अटक केलेल्या या तिघांना न्यायालयात हजर केले असता गुन्ह्यातील पिस्तूल जप्त करणे, शस्त्रे जप्त करणे, त्यांचे इतर साथीदार व गुन्ह्यातील व्हेरिटो कार शोधणे याबरोबरच गुन्ह्यातील पिस्तूल कोणाकडून व कधी खरेदी केली याबाबत तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली़ या संशयितांवर पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी कलामन्वये गुन्हा दाखल आहे़