शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौकीचा झाला कायापालट

By admin | Updated: December 20, 2015 22:41 IST

जिल्हा रुग्णालय : कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर

नाशिक : शहरात वा जिल्ह्यात कोठेही खून, हाणामारी, अपघात यांसारख्या घटनांनंतर सर्वाधिक व सर्वप्रथम दबाव असतो तो जिल्हा रुग्णालय व तेथील पोलीस चौकीमध्ये. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर लागलीच, घटनेची माहिती देण्यासाठी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी ना फोनची व्यवस्था होती, ना वायरलेस यंत्रणेची.मात्र, काही दिवसांपूर्वी पोलीस उपआयुक्त विजय पाटील जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्यापुढे कर्मचाऱ्यांची गैरसोय मांडली अन् पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पोलीस चौकीचा कायापालट झाला आहे़जिल्हा रुग्णालयात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण होते़ अशावेळी सरकारवाडा पोलीस ठाण्याकडून जादा पोलीस कुमक मागविणे, अपघातात जखमी झालेल्या व उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाची संबंधित पोलीस ठाण्यास एमएलसी (मेडिकल लिगल केस) कळविणे, अशा एक ना अनेक कारणांसाठी येथील पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:चा मोबाइल अथवा जिल्हा रुग्णालयाच्या फोनचा सहारा घ्यावा लागत होता़सुमारे दोन आठवड्यांपूर्वी पोलीस उपआयुक्त विजय पाटील हे जिल्हा रुग्णालयात कामानिमित्त आले होते़ त्यांना पत्रकारांनी पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांची गैरसोय तसेच संपर्क यंत्रणेबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी स्वत: चौकीत येऊन पाहणी केली़ यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चौकीची रंगरंगोटी, तसेच संपर्कासाठी वायरलेस सेटही देण्यात आला़ मात्र सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या टेलिफोन सुविधेबाबत पाटील यांनी पुढाकर घेऊन शनिवारी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत दूरध्वनी सेवा (क्रमांक -०२५३ - २३१४५८६) उपलब्ध करून दिली़जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीसमोर अस्ताव्यस्तपणे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांचा अडथळा दूर करण्यासाठी बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे़ यामुळे एका अर्थाने पोलीस चौकीने मोकळा श्वास घेतला आहे़ गत कित्येक वर्षांपासून पोलीस कर्मचारी चौकीत असुविधा असूनही कर्तव्य करीत होते़ पोलीस उपआयुक्त पाटील यांनी केवळ दखलच घेतली नाही, तर तत्काळ सुविधाही उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत सद्य:स्थितीत सकाळी व रात्रपाळीत प्रत्येकी दोन पोलीस कर्मचारी काम करीत असून, यामध्ये वाढ करण्याची तसेच पोलिसांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची नितांत आवश्यकता असून, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ (प्रतिनिधी)