शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: May 6, 2017 01:06 IST

चांदवड : येथील बाजार समितीत शासनाचा निर्णय हमाली, तोलाई, वाराई घेऊ नये, असे असतानाही हमाली, तोलाई व वाराईच्या नावाखाली एका ट्रॅक्टरमागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांची रक्कम कापली जाते.

महेश गुजराथी । लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वजनकाटा हा वे-ब्रिजवर होत असताना हिशेबपट्टी, सौदापट्टी करताना प्रत्यक्षात पोते नसताना पोते लिहिले जाते. शासनाचा निर्णय हमाली, तोलाई, वाराई घेऊ नये, असे असतानाही हमाली, तोलाई व वाराईच्या नावाखाली एका ट्रॅक्टरमागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांची रक्कम कापली जाते. असा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी चांदवड येथे काही शेतकऱ्यांनी एका व्यापाऱ्याच्या खळ्यावर या मुद्द्यावर वाद घालत बाजार समितीच्या सचिव व कर्मचाऱ्यांनी खळ्यावर येऊन तातडीने दखल घेतली. मात्र याप्रश्नी चांदवड बाजार समितीने त्वरित निर्णय घ्यावा, असे निवेदन शेतकऱ्यांनी सचिवांना दिले आहे.चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांदा शेतमालाच्या लिलावानंतर कांद्याचे वजन वे-ब्रिजवर इलेक्ट्रॉनिक काट्यावर होते. याचे पैसेही शेतकरीच देतो. त्यानंतर कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर नेला जातो व शेतकरी टॅक्टरचे फाळके स्वत: पाडतो किंवा हमाल फक्त फाळके पाडतो. ट्रॅक्टर हॅड्रोलिक होऊन आॅटोमॅटिक खाली होतो. या प्रक्रियेत काटा करण्याचे काम माथाडी कामगाराकडून होत नाही. पावती करीत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती त्यावर पोत्याची नोंद करते, मात्र प्रत्यक्षात पोते भरले जात नाही. त्या अनुषंगाने मात्र हमाली, तोलाई, वाराई कपात केली जाते. या सर्व प्रकारात शेतकऱ्याची सुमारे ५०० रुपयांची लूट केली जाते. प्रत्येक बाजार समितीत दररोज सुमारे १५०० ट्रॅक्टर कांद्याची आवक होते व ५०० रुपयाप्रमाणे ७५ हजार रुपये काही कारण नसताना कापले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, ही चक्क लूट असल्याचा आरोप शेतकरीवर्गाने केला आहे.या निवेदनावर बापू अहेर, सुधाकर अहेर, मोहन जाधव, अशोक अहेर, प्रदीप कारभारी सोनवणे, हेमंत जाधव, रमेश जाधव, गिरिधर देसले, निंबा जाधव, राजेंद्र सुकदेव मोरे, शांताराम देवरे, शंकर भदाणे, हिरामण निकम, गोकुळ निकम, शरद पवार, चिंधा जाधव, अमोल सोनवणे, मधुकर अहिरे, विशाल सूर्यवंशी, रवींद्र संसारे, हेमंत सूर्यवंशी, शांताराम माळी आदींसह अनेक शेतकऱ्यांचा सह्या आहेत. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधला असता, प्रत्यक्षात पोते भरले जात नाही, पावतीवर मात्र पोते लिहिले जाते, याबाबत योग्य तो निर्णय संचालकांच्या कानी टाकून घेऊ, असे सांगण्यात आले. चांदवड येथे एका खळ्यावर हॅड्रोलिक ट्रॉलीतून कांदा खाली करताना शेतकरी. त्यामुळे हमाली, तोलाई, वाराईचा संबंध येतोच कुठे?