शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा डाव हाणून पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:14 IST

कळवण : तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खासगी मालकीच्या क्षेत्रात कुठलीही परवानगी नसताना वनविभागाने सुरू केलेल्या वनतळ्याच्या कामावर ...

कळवण : तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खासगी मालकीच्या क्षेत्रात कुठलीही परवानगी नसताना वनविभागाने सुरू केलेल्या वनतळ्याच्या कामावर आमदार नितीन पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि वनतळ्याचे काम तत्काळ बंद केल्यामुळे वनविभागामुळे भूमिहीन होणाऱ्या कुटुंबाला उपजीविकेसाठी शेतजमीन परत मिळाली.

दरम्यान, आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यात वनविभागाचा मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त केली असून, खासगी क्षेत्रात वनतळे बांधून आदिवासींना भूमिहीन करण्याचा वनविभागाचा डाव उघडकीस आल्यामुळे पवार संतप्त झाले. कळवण व सुरगाणा तालुक्यात गेल्या पाच वर्षांत वनविभागाने केलेल्या मनमानी कारभार व कामांची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्या दरबारात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओतूर परिसरात वनविभागाने ओतूर, मुळाणे, नरूळ भागात अशा पद्धतीने विना परवानगीने शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रात शेतात वनतळे केल्याचे बोलले जात असून, वनविभागाच्या मनमानी पद्धतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी ओतूर परिसरातील नागरिकांनी आमदार पवार यांची घटनास्थळी भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

ओतूर येथील आदिवासी शेतकरी तानाजी काशीराम गोधडे यांच्या मालकीची गट क्र.८८/३ मध्ये ८० आर जमीन त्यांची परवानगी न घेता त्यांच्या शेतात विना परवानगीने पोकलॅन्डच्या साहाय्याने वनतळ्याच्या कामास सुरुवात करत खोदकाम सुरू केले. त्यामुळे श्री. गोधडे यांची या कामास हरकत असून, शेतात वनतळे झाल्यावर गोधडे यांना शेतजमीन राहणार नसून भूमिहीन होणार होते.

-------------------

ग्रामसभांना विशेष अधिकार

कळवण तालुक्यात पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार पेसा क्षेत्रातील आदिवासीच्या ग्रामसभांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. अनुसूचित क्षेत्रात वनविभागाने कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील ग्रामसभेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना कळवण तालुक्यातील वनविभागाअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांसाठी वनविभागाने कुठलीही परवानगी घेतलेली नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करा, अशी मागणी पुढे आली आहे.