शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

निफाड-पिंपळगाव रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: July 1, 2017 00:40 IST

निफाड : निफाड ते पिंपळगाव बसवंत रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : निफाड ते पिंपळगाव बसवंत रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे. त्यामुळे निफाड, पिंपळगाव, दावचवाडी, लोणवाडी यांसह इतर गावांतील नागरिकांत प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. निफाड तालुक्यातील निफाड, पिंपळगाव या शहरांना जोडणारा आणि सुरत-शिर्डी साईमार्ग अशी ओळख असणारा हा रस्ता आहे. रस्ता सध्या जागोजागी खड्ड्यांनी विणलेल्या जाळ्यासारखा दिसत आहे. निफाड हे तालुक्याचे ठिकाण आणि भारतातील मुख्य शेतमाल बाजारपेठ पिंपळगाव (ब.) यांना जोडणारा हा रस्ता पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे. या रस्त्याच्या क्षेत्रात दावचवाडी, नांदुर्डी, कारसूळ, कुंदेवाडी, पालखेड, रौळस, निफाड ही गावे येतात. या गावांतून व तालुक्याच्या इतर भागातून दररोज भाजीपाला, फळे, दूध यांची या रस्त्यावरून वाहतूक होत असते. परंतु मालवाहतूक करणाऱ्या या ट्रक, टेम्पो, जीप व इतर वाहनांना हे खड्डे चुकवत प्रवास करावा लागतो.  या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना पाठीचे आजार जडले आहेत. शेजारील गुजरात राज्यातून साईदर्शनासाठी दररोज हजारो  भाविक पायी व वाहनांनी प्रवास करतात. या भाविकांना रस्त्याने  मोठी कसरत करत साईदर्शनास जावे लागत असल्याने या रस्त्याबद्दलची नाराजी त्यांच्या चर्चेतून दिसते. या खड्ड्यांच्या रस्त्यामुळे परराज्यातसुद्धा पिंपळगाव रस्त्याचे नाव गेले असून,  या रस्त्याची नाचक्की परराज्यात होत आहे. आजवर या रस्त्यावर  खड्डे चुकविताना अनेक अपघात झालेले आहेत, तर काहींचा मृत्यू ओढावलाय. नागरिकांनी आवाज उठवल्यास केवळ कसेबसे अत्यन्त निकृष्ट पद्धतीने हे खड्डे बुजविले जातात आणि थोड्याच दिवसांत परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. मागील पूर्ण वर्षभरात एकदाही रस्त्याचे काम झाले नाही. विशेष म्हणजे, पिंपळगाव बसवंतचे मोठमोठे नेतेही या प्रश्नावर मूग गिळून बसले आहेत. या प्रश्नावर राजकीय पक्ष तर थंड गोळ्यासारखे झालेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, मागे या रस्त्याचे टेंडरही निघाले होते. मग नेमकी माशी कुठे शिंकली, असा सवाल प्रवासी व नागरिक करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन हे मोठमोठे खड्डे बुजवावे, अशी मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे.