शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरवैद्य येथे प्लास्टिकमुक्त अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:49 IST

नांदूरवैद्य : स्वच्छ भारत अभियानानंतर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्त अभियान सुरु राबविण्यासाठी येत्या २ आॅक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं जयंती आहे. या निमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथील सरपंच उषा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देस्वच्छता राखण्यासाठी डस्टबीन, घंटागाडीची ग्रामस्थांची मागणी

नांदूरवैद्य : स्वच्छ भारत अभियानानंतर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्त अभियान सुरु राबविण्यासाठी येत्या २ आॅक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं जयंती आहे. या निमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथील सरपंच उषा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.नांदूरवैद्य येथे पार पडलेल्या या प्लास्टिकमुक्त अभियान विशेष ग्रामसभेत सुरु वातीस ग्रामअधिकारी किरण शेलावणे यांनी ग्रामस्थांना या विशेष ग्रामसभेविषयीचे पत्रक वाचून दाखवले. यांनतर गावामध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण गावामध्ये प्लास्टिक बंदीचा ठराव येत्या महात्मा गांधी जयंतीदिनी करण्यात येईल असे यावेळी सांगितले.यावेळी ग्रामस्थांनी सरपंच उषा रोकडे यांच्याकडे प्रत्येक कुटुंबास एक डस्टबीन व घंटागाडीची व्यवस्था केल्यास गावात अस्वच्छता होणार नाही व गावात आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल अशी मागणी केली.चौकट....काही नागरिकांनी गावातील विविध समस्यांवर आवाज उठविण्यास सुरु वात केल्यानंतर ग्राम अधिकारी शेलावणे यांनी ग्रामस्थांना सांगितले की, की ही फक्त प्लास्टिकमुक्त अभियानाविषयी तातडीने बोलावण्यात आलेली विशेष ग्रामसभा असून गावातील समस्यांवर २ आॅक्टोंबरला होणाऱ्या ग्रामसभेमध्ये चर्चा करु न त्या समस्यांचे निरसन केले जाईल असा बचावात्मक पविञा घेत ग्रामस्थांना शांत केले.त्यानंतर प्लास्टिक बंदीवर विविध उपाययोजना करण्यासाठी सरपंच व ग्रामस्थांमध्ये चर्चा करण्यात आली.याप्रसंगी उपसरपंच पोपटराव दिवटे, ग्रामपंचायत सदस्य केशव डोळस, नितीन काजळे, अ‍ॅड चंद्रसेन रोकडे, पंढरीनाथ मुसळे, गणेश मुसळे, कुंडलिक मुसळे, भाऊसाहेब मुसळे, रोहिदास सायखेडे, रामकृष्ण दवते, मारूती डोळस, माधव कर्पे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.गावामध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यापेक्षा शासनाने प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणारे कारखाने आधी बंद करावे.यामुळे ख-या अर्थाने प्लास्टिकमुक्त अभियान यशस्वी होऊन गावामध्ये स्वच्छता व आरोग्य सूरिक्षत राहण्यास मदत होईल.व आपोआपच प्लास्टिकमुक्त गाव होण्यास चालना मिळेल.- पंढरीनाथ मुसळे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते.