मधील व परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
गोरक्षनगर मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी आयोजन केले होते. कै. किशोर सूर्यवंशी मार्ग कृष्णा माधव मंगल कार्यालयात रविवारी सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून नामांकित वैद्यकीय मंडळींकडून आरोग्य रक्त, चाचणी, नेत्र, मधुमेह, पोटाचे विकार तपासणी केली.
निसर्गनगर मित्र मंडल, दिंडोरी रोड
पंचवटी: दिंडोरी रोडवर समस्त निसर्गनगर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समिती सभापती सभापती गणेश गीते, गटनेता अरुण पवार, नगरसेवक रंजना भानसी, महेश कल्याणकर उपस्थित होते. निसर्गाचा समतोल रहावा यासाठी वड, पिंपळ, चिंच, आंबा यासह विविध ७५ वृक्षांचे रोपण केले. यावेळी राजेंद्र घडवजे, विशाल बोडके, महेश कल्याणकर, चेतन घरटे, विनोद बिरारी, रवी मोरे, प्रवीण पवार, वैभव तिसगे, संकेत शिरसाठ, उपस्थित होते.
कर्णनगर, पेठरोड.
पंचवटी: पेठरोड आरटीओ कर्णनगरला आपलं वाचनालयात राष्ट्रवादी युवक महिला काँग्रेसतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार जयंत जाधव, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम कडलक, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस महेश शेळके तसेच राष्ट्रवादी महिला अविदा शेळके उपस्थित होते.
६० रक्त पिशव्या संकलन
नाशिक: शिबिरात ६० रक्तदात्यांनी कोविड महामारी काळात रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली. यावेळी अभिजित सोनावणे, रवींद्र पगारे, विक्की निकम, सुनील आजबे, शुभम लंवाडे, ओमकार शिंदे, राहुल धस, करण शिंदे, सागर शेळके आदींसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महेश शेळके, अविदा शेळके यांनी केले होते.
म्हसरूळ येथील स्वराज्य परिवारातर्फे हुतात्मा स्मारकात ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब नेहरे, विद्या शिंदे, गुलाब गांगुर्डे, जयश्री जाधव, रेखा नेहरे, रुंजा मोराडे, प्रकाश उखाडे, सोमनाथ बर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारत मातेचे पूजन केले.