नाशिक : वाडीवऱ्हे येथे भरधाव पिकअप गाडीने तीनवर्षीय बालिकेला चिरडल्याने तिचा जागीच अंत झाल्याची घटना सायंकाळी साडेपाच वाजता घडली़ माहेनूर गुलाम हुसेन मणियार (वय ३), रा़ वाडीवऱ्हे असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे़ याबाबत वाडीवऱ्हे पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार मुंबई-आग्रा महामार्गा वरील कवठी फाटा येथून वाडीवऱ्हे गावाकडे सदर बालिका आपल्या वडिलांसोबत पायी जात होती़ ती रस्ता ओलांडत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या महेंद्रा पिकअपने (क्र. एमएच १५, एजी ७३४९) तिला चिरडले़ यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला़ अपघात व बालिकेच्या मृत्यू प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गाडीचालक संजय बोराडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़
वाडीवऱ्हेत पिकअपने बालिकेला चिरडले
By admin | Updated: August 12, 2014 02:03 IST