निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे येथे विहिरीत पडून कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.निऱ्हाळे शिवारात पोपट गिते यांची गटक्रमांक ९५ मध्ये विहीर आहे. गिते यांचे बंधू भाऊसाहेब गिते विहिरीवरील पंप सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विहिरीतील पाण्यावर मृत कोल्हा तरंगत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गिते यांनी नांदूरशिंगोटे वनकार्यालयातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. त्यांनी मृत कोल्ह्यावर अंत्यसंस्कार केले.(वार्ताहर)
निऱ्हाळे येथे विहिरीत पडून कोल्ह्याचा मृत्यू
By admin | Updated: December 20, 2014 00:37 IST