पेठ : सकाळच्या प्रहरी सूर्यनारायणाच्या साक्षीने दारासमोर ढोलच्या तालावर ठेका धरणारा नंदीबैल आणि तेवढ्याच कुशलतेने आपले भविष्य सांगणाºया नंदीबैलाच्या गुबूगुबूचे स्वर सध्या दुर्मीळ झाले आहेत.‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का ?’ हे बालगीत अनेक शाळांमध्ये आवडीने गायिले जात असले तरी प्रत्यक्षात या ‘भोलानाथ’चे दर्शन दुर्र्मीळ झाले आहे. बदलती जीवनशैली व वाढती महागाई यामुळे पिढ्यान्पिढ्या चालत आलेला या व्यवसायाला मरगळ आली आहे. जनतेची दातृत्वाची भावनाच संपत चालल्याने नंदीबैल व्यवसायाला अवकळा आली आहे. दिवाळीचा सण आटोपल्यावर नंदीबैल व्यावसायिक जवळपास सहा महिने घराबाहेर असतात. ‘विंचवाचे बिºहाड पाठीवर’ या उक्तीप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह ही मंडळी गावठाणच्या एका कोपºयात उघड्यावर वास्तव्य करत असते. भल्या पहाटे उठून नंदीबैलावर झूल चढवून त्याला सजविण्यात येते.अनेक कुंटुबांचा हा पिढ्यान्पिढ्या चालत असलेला पारंपरिक व्यवसाय असून केवळ संस्कृती जतन करण्यासाठी अनेक कुटुंबे हा व्यवसाय करत असल्याचे सांगतात. जनावरांना चारा, त्यांची देखभाल व कुटुंबाचा खर्च याचे गणित जुळवताना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत असल्याचेही ते सांगतात.
पेठ : व्यवसायाला अवकळा; कुटुंबाचा भार सोसण्यासाठी कसरत नंदीबैलाचे दर्शन झाले दुर्मीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:17 IST
सकाळच्या प्रहरी सूर्यनारायणाच्या साक्षीने दारासमोर ढोलच्या तालावर ठेका धरणारा नंदीबैल आणि तेवढ्याच कुशलतेने आपले भविष्य सांगणाºया नंदीबैलाच्या गुबूगुबूचे स्वर सध्या दुर्मीळ झाले आहेत.
पेठ : व्यवसायाला अवकळा; कुटुंबाचा भार सोसण्यासाठी कसरत नंदीबैलाचे दर्शन झाले दुर्मीळ
ठळक मुद्देनंदीबैल व्यवसायाला अवकळा व्यावसायिक सहा महिने घराबाहेरपिढ्यान्पिढ्या चालत असलेला व्यवसाय