शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा कायम

By admin | Updated: July 16, 2016 00:30 IST

सभापती बैठक : मंगळवारी पणनमंत्र्यांना भेटणार

 नाशिक : सहा दिवसांपासून सुरू असलेला संप कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भाजीपाला व फळभाज्या आडते व व्यापाऱ्यांनी मागे घेतला असला तरी, कांदा, बटाटा संघटनेने संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कांदा व बटाट्याचे व्यवहार ठप्प होते.दरम्यान, शुक्रवारी (दि.१५) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतींची तातडीची बैठक होऊन त्यात येत्या मंगळवारी (दि.१९) सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांना बाजार समिती नियमन मुक्तीनंतरच्या येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा करणार आहे. बाजार समितीच्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींनी कांदा व बटाटा व्यापाऱ्यांनी संप मागे घेण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते बाजार समितीच्या आत एक कायदा आणि बाजार समितीच्या बाहेर दुसरा कायदा, हा नियम व्यापारी व आडत्यांना मान्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास दीड हजार कांदा व बटाटेचे आडते व व्यापाऱ्यांनी त्यांचे परवाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे परत करून लिलावात सहभागी न होणार असल्याचे कळविले आहे, असे सभापतींनी स्पष्ट केले. त्यावर या कांदा व बटाटा व्यापाऱ्यांशी एक तातडीची बैठक बोलविण्याची चर्चा बैठकीत झाली. त्यानुसार येत्या रविवारी (दि.१७) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा व बटाटे व्यापारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीस बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे, केदा अहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, जयदत्त होळकर, उषा शिंदे, जिल्हा बॅँक संचालक धनंजय पवार, प्रसाद हिरे, प्रवीण दराडे, तेज कवडे, दत्तात्रय पाटील यांच्यासह बहुतांश बाजार समितीचे सभापती उपस्थित होते. (प्रतिनिधी)