शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालय क्षमतेच्या तुलनेत ५० टक्के परवानगी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:13 IST

नाशिक : राजकीय सभा, मेळावे, मुख्य बाजारपेठांमधील गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसताना केवळ विवाह सोहळ्यांना १०० नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादा घालणे ...

नाशिक : राजकीय सभा, मेळावे, मुख्य बाजारपेठांमधील गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसताना केवळ विवाह सोहळ्यांना १०० नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादा घालणे योग्य नाही. केवळ विवाहांमुळे कोरोना फैलावत नसल्याने पूर्वीप्रमाणे कार्यालय क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हा केटरींग असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात साखळी उपोषणासह जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम गाढवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गत वर्षभर कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे सर्व केटरींग व्यावसायिकांचे व्यवसाय कोलमडून पडू लागले आहेत. जिल्ह्यातील व्यावसायिकांचे सुमारे १५० कोटींचे नुकसान तसेच प्रत्येक लग्न तिथीला हजारो बेरोजगारांना मिळणारा रोजगार बुडत असून त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो नागरिकांच्या उपजिवीकेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची दहशत काहीशी कमी होऊन परिस्थिती सुधारत असताना १०० नागरिकांच्या उपस्थितीचा निर्बंध अन्यायकारक आहे. कोणत्याही मंगल कार्यालय किंवा लॉन्स क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीच्या पूर्वीच्या नियमाला पुन्हा लागू करण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे गाढवे यांनी नमूद केले. यावेळी पंकज पाटील, अनिल जोशी, अमर वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

अन्यथा जनहित याचिका

येत्या १५ दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास जनहीत याचिका तसेच राज्यभरात संघटनेच्या वतीने साखळी उपोषणासह सर्व पर्यायांचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा राहुल भावे यांनी दिला. तसेच विवाह समारंभात कुणी मास्क लावला नसेल, त्यालाच दंड करावा . त्यासाठी कार्यालय किंवा आयोजकांना दंड करणे अयोग्य असल्याचेही भावे यांनी नमूद केले.