शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

स्थायीवर प्रस्ताव : घरगुती दरात प्रति हजारी एक रुपया वाढीची शिफारस

By admin | Updated: February 24, 2016 23:53 IST

टेलिस्कोपिक दराने पाणीपट्टी आकारणी

नाशिक : ‘जादा पाणीवापर जादा आकारणी आणि कमी पाणीवापर कमी आकारणी’ हे टेलिस्कोपिक दर आकारणीचे सूत्र वीज वितरण कंपनीप्रमाणेच महापालिकेनेही पाणीपट्टीबाबत लागू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवला आहे. याशिवाय, पाणीपुरवठ्यावर होणारा वाढता खर्च लक्षात घेता मीटरद्वारे होणाऱ्या पाणीपुुरवठ्यात सन २०१८-१९ या वर्षापर्यंत प्रतिवर्षी प्रति हजारी लिटर्समागे घरगुती पाणीवापरासाठी एक रुपया वाढ करण्याचेही प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. महापालिकेने सन २००७ मध्ये तीन वर्षांसाठी पाणीपट्टीत वाढ केली होती. त्यानंतर आजपर्यंत पाणीपुरवठ्याच्या दरात वाढ झालेली नाही. पाटबंधारे विभागाकडून पिण्याच्या पाण्याच्या दरात झालेली सुमारे ४० टक्के वाढ, महावितरण कंपनीच्या वीज दरात झालेली १४० टक्क्यांनी वाढ, पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या साधनसामग्री दरातही झालेली वाढ आणि आस्थापना खर्चात १०० टक्क्यांपर्यंत झालेली वाढ लक्षात घेता प्रशासनाने पाणीपुरवठा दरात वाढ प्रस्तावित केली आहे.