शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

प्रजा उदार, पण राजाचा नकार

By admin | Updated: June 26, 2014 00:49 IST

प्रजा उदार, पण राजाचा नकार

 

नाशिक : पर्यावरणाविषयी ओरड करणारे वृक्ष लागवडीत उत्साह दाखवित नाहीत, हा पालिकेचा नेहमीचाच मुद्दा खोडून काढून निमा या उद्योजकांच्या संस्थेने शहरात हवे तिथे झाडे लावून आर्थिक जर्जर झालेल्या पालिकेचे सव्वादोन कोटी रुपये वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु महापौरांनी बघू, करू असे सांगत कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने निमाचा उत्साह मावळण्याच्या बेतात आहे.महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाच्या वतीने दरवर्षी लाखो झाडे लावल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात ते होते किंवा नाही हा संशोधनाचा विषय असताना आताही ठेकेदारांमार्फत शहराच्या सहाही प्रभागात झाडे लावण्यासाठी सव्वादोन कोटी रुपयांच्या निविदा महापालिकेने दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रात जाहिरात देऊन मागविल्या होत्या. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. एलबीटीची अपेक्षित वसुली होत नसल्याने नागरी कामांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेला कर्ज काढण्याची वेळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर निमा या संस्थेने महापालिकेचे सव्वादोन कोटी रुपयांची बचत व्हावी, यासाठी महापालिका म्हणेल तेथे उद्योजक झाडे लावतील, अशी तयारी केली. निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सरचिटणीस मंगेश पाटणकर, कर समितीचे अध्यक्ष मनोज पिंगळे, उद्योजक रवि वर्मा, व्हिनस वाणी यांनी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांची भेट घेऊन प्रस्ताव दिला; परंतु महापौरांकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. महापालिकेला झाडे लावावीच लागतात. ते बंधनकारक आहे. सध्या न्यायालयात वृक्षतोडीच्या विरोधात याचिका दाखल असल्याने महापालिकेला नियमानुसार अधिक संख्येने झाडे लावावी लागणार आहेत, असे महापौरांनी सांगितले. शिवाय सुरुवातीला दाखविला जाणार उत्साह नंतर राहत नाही, असे त्यांनी वाहतूक बेटाच्या विकासाच्या मुद्द्याने सांगितले. तथापि, महापालिका सांगेल तितकी झाडे उद्योजक स्वखर्चाने लावतील, त्याबदल्यात नाव किंवा कोणताही मोबदला नको आहे, उलट झाडे लावण्याबाबत महापालिकेने उद्योजकांना करार करून द्यावा, असे उद्योजकांनी सांगूनही महापौरांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने उद्योजकांनी घरपट्टी भरावी, असा अन्य सल्लाही महापौरांनी यावेळी दिला.